•नानभाऊ पटोले यांची विशेष उपस्थिती…
•महाराष्ट्र प्रदेश कमिटी प्रतिनिधी महेंद्र लोढा यांचे पदवीधर मतदारांनी केली नाव नोंदणी
अजय कंडेवार, वणी:- अमरावती पदवीधर मतदार संघाच्या 2023 चा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे खंबीर नेतृत्व असलेले उमेदवार धीरज लिंगाडे यांचा नावावर शिकामोर्तब करण्यात आले. त्यामूळे धीरज लिंगाडे यांच्या समर्थनात वणी येथे दिनांक 22 जाने रोज रविवारला वेळ दुपारी 12 वाजता शेतकरी मंदिर येथे “पदवीधर मेळावा” घेण्यात येणार आहे.
राज्यातील सत्तांतरानंतरही धीरज लिंगाडे यांनी ठाकरे गटाची साथ सोडली नाही. पण अमरावतीची जागा काँग्रेसकडे असल्याने अखेर शिवसेनेने आपला उमेदवार काँग्रेसच्या कोट्यात दिला आहे. धीरज लिंगाडे यांना महाविकास आघाडीकडून काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली गेली.वणी विधानसभा येथे जवळपास 7 हजार पदवीधर मतदार आहे.. त्यातच महाराष्ट्र प्रदेश कमिटी प्रतिनिधी महेंद्र लोढा यांचे पदवीधर मतदाराना एकत्र करण्याचे कार्य देखील जोमात सूरु आहे त्यात शंका नाही. कारण काँग्रेसचा एक रुबाबदार नेता म्हणून वणी उपविभागात ओळख आहे.
धीरज लिंगाडे यांना महाविकास आघाडी तर्फे उमेदवारी जाहिर होताच.वणी उपविभागात धीरज लिंगाडे सर्थनात निवडून आणण्याकरिता कँपनिंगही जोमात सूरु केल्याची माहितीही समोर आली.हीच त्यांची हायकमांडचा आदेशाला मानाचा मुजरा म्हणायलाही हरकत नाही.
त्यासाठी जास्तीत जास्त मतांनी धिराज लिंगाडे यांना जिंकून आणण्याचा निर्धाराने वणी येथे “पदवीधर मेळावा” आयोजन करण्यात आले . तरी सर्वांनी या होणाऱ्या पदवीधर मेळाव्यात उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश कमिटी प्रतिनिधी महेंद्र लोढा व वणी विधानसभा काँग्रेस तर्फे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, बाळुभाऊ धानोरकर (खासदार), वामनराव कासावार (माजी आमदार), विश्र्वास नांदेकर(माजी आमदार) या पाहुण्याचा विशेष उपस्थीती असणार आहे.