•41 फुटाची दहीहंडी अन् गोविंदा फोडणार असा असणार थरार.
अजय कंडेवार,वणी :- श्री.कृष्ण जन्माष्टमीनिमित्त शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षनेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन दि.11 सप्टेंबर रोजी दुपारी 2, शासकीय मैदान, पाण्याची टाकी, वणी येथे वाजता करण्यात आले आहे.
वणीत प्रथमच मनसे चा वतीने दहीहंडीचा थरार आयोजन केल्याने अनेक गोविंदा यांना यामध्ये सहभागी होण्याची संधी चालून आली आहे . नागरीकांना याठिकाणी दहीहंडीचा थरार अनुभवयास मिळणार आहे. यानिमित्ताने प्रसिध्द मराठी सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी यांची उपस्थिती असून शहरवासीयांना विविध कार्यक्रमांची मेजवानी मिळेल.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षनेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून विदर्भातील सर्वात मोठ्या दहीहंडीचे आयोजन केले आहे. या दहीहंडीसाठी प्रथम बक्षीस २ लाख ५१ हजार रुपये, द्वितीय बक्षीस १ लाख रुपये, तृतीय बक्षीस ५१ लाख रुपये असणार आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि महाराष्ट्रातील नामांकीत गोविंदा पथकांना निमंत्रित केले आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी महिलांना विशेष आसन व्यवस्था आणि ए.आर रहमान यांच्या कार्यक्रमात वापरात असणारी म्युझिकची साऊंड सिस्टम असणार आहे.
त्याकरिता या उत्सवाकरीता भव्य संख्येने उपस्थिती व्हावे असे आव्हान मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेला मनसेचे नेते राजू उंबरकर, फाल्गुन गौरकार (तालुका अध्यक्ष), शिवराज पेचे (शहर अध्यक्ष),शुभम पिंपळकर,लक्की सोमकुवर हे उपस्थित होते.