•कायदा व सुव्यवस्था अबाधित.
•पोलिसांचे परिश्रम, कार्यकर्त्यांची समझदारी व नागरिकांच्या सहकार्याला श्रेय.
अजय कंडेवार,वणी:-शहरात व वणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या विविध गावांमध्ये सार्वजनिक व खाजगी अशा अनेक दुर्गोत्सव मंडळांनी शांततापूर्वक व नियम पाळत उत्साहात दुर्गोत्सव विसर्जन आटोपले. सर्वच ठिकाणी पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
डझनावर संवेदनशील व अतिसंवेदनशील ठिकाणे असलेल्या, दुर्गोत्सव शांततेत पार पडला. त्याचे श्रेय विविध घटकांना दिले जात आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून Dysp गणेश किंद्रे व वणी ठाणेदार अजित जाधव सतत रस्त्यावर उतरले होते. त्यांनी स्वत: गल्लीबोळात शिरुन विसर्जन मिरवणुकीचे मार्ग व ठिकाणांची पाहणीही केली होती.सतत या नवरात्री उत्सवात नऊ दिवसही प्रत्यक्ष रस्त्यावर उतरल्याचा व त्यामुळे अधिनस्त संपूर्ण यंत्रणा चार्ज झाल्याचा हा परिणाम असल्याचे पोलीस अधिकारी-कर्मचारी सांगत आहे. तर कोणतेही गालबोट न लागता शांततेत पार पडलेल्या या नवरात्री उत्सवाचे श्रेय मनमिळावू Dysp गणेश किंद्रे ,हसमुख चेहरा असलेले वणीचे ठाणेदार अजित जाधव व वणी पोलिसांची टीम वर्क, त्यांनी रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून घेतलेले परिश्रम, प्रत्येक दुर्गा मंडळांच्या कार्यकर्त्यांची समझदारी, नागरिकांनी केलेले सहकार्य आदी बाबींना देत आहेत.सण उत्स म्हटले की, पोलिसांच्या डोक्याला टेंशन ठरलेले त्यात बंदोबस्त लावता लावता हाल तरीही प्रचंड परिश्रम घेऊनही परिक्षेत्रात कुठे ना कुठे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो आणि त्यामुळे संपूर्ण उत्सवाला गालबोट लागते. परंतु यंदाचा नवरात्री उत्सव त्याला अपवादच ठरला आहे.
•नवरात्र उत्सव तसेच दुर्गा देवी विसर्जन मिरवणूकीला तन, मन, धनाने मदत करीत संपूर्ण वणी परिसरात अतिशय आनंदाने कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये यासाठी संपूर्ण पोलीस कर्मचारी बांधव व स्वतः झटून / राबून कायदा व सुव्यवस्थेत उत्सव यशस्वीपणे आनंदात पार पाडल्याबद्दल Dysp गणेश किंद्रे व वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार PI अजित जाधव आणि संपूर्ण पोलीस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन… .- (वणी नागरीक)
•दुर्गोत्सव मिरवणुकीत कायदा व सुव्यवस्था राखा राखण्याचे ठाणेदार अजित जाधव यांचे आव्हान कामी आले….
“दुर्गोत्सव मिरवणूकीला गालबोट लागुन दोन समाजात तेढ निर्माण होईल असे प्रकार टाळा. एकोप्याने दुर्गोत्सव साजरा करा. दुर्गोत्सव दरम्यान कोणी कायदा व सुव्यवस्था हातात घेण्याचा किंवा बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई करून कायमाची त्याला अद्दल घडविण्यासाठी पोलीस प्रशासन सक्षम आहे. अश्या सुचना प्रत्येक मंडळांना दिल्या होत्या.”
• Dysp गणेश किंद्रे ठाणेदार अजित जाधव ‘नशामुक्त पहाट अभियानात सहभागी व्हा’असे आव्हानही केले होते.
“नवरात्रोत्सवात दरम्यान कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी सर्व दुर्गोत्सव मंडळाच्या पदाधिकार्यांनी काळजी घेऊन उत्सव साजरा करावा अशा सूचनाही दिल्या. विशेष म्हणजे, पोलिस अधीक्षकांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात नशामुक्त पहाट अभियान राबविले जात होती. व्यसनात अडकलेल्या युवकांना यातून बाहेर काढण्यासाठी जनजागृती मोहिम राबविली.