Ajay Kandewar,Wani :- वणी येथील “तनुश्री ” नामक “नवीन गुटखा कींग” ने गेल्या काही दिवसात आपले बस्तान वणी तालुक्यात मांडण्यास सुरुवात केली असल्याचे दिसत आहे. त्याच्याकडून तालुक्यातील ग्रामीण भागात गुटख्याचा अवैधरित्या पुरवठा करण्यात येत असल्याची विश्वसनीय माहिती आहे. हा “तनुश्री” नामक “नवी झाड “खेड्या-पाड्यात गुटखा व सुगंधीत तंबाखूची खुलेआम हेराफेरी करीत असल्याची चर्चा आहे.चक्क हा या व्यवसायामुळे लाखोंचा धनी बनला आहे,असे असतानाही वणी येथील अन्न औषध प्रशासन मात्र या गंभीर बाबीकडे कानाडोळा करीत असल्याचे दिसत आहे.
राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा वणी तालुक्यात मात्र जोमात विकल्या जात आहे.राज्याच्या सीमेलगत असलेल्या तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यांमधून गुटखा तस्करी बिनबोभाटपणे सुरू आहे. या अवैध गुटखा तस्करीचे केंद्र असलेल्या वणी येथील “तनुश्री ” नावाच्या या “गुटखा किंग “ने ग्रामीण भागात सर्वदूर आपले बस्तान मांडले आहे. असे असतानाच त्याने आता आपला मोर्चा संपुर्ण तालुक्याकडे वळवला आहे. वणी शहरासह ग्रामीण भागात जोमात गुटखा सुगंधित तंबाखू विक्री केल्या जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व पोलीस पथक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळीत असल्याच्या कारवाई दिसून येत आहे. तसेच त्यांचे खबऱ्यांचे नेटवर्क सुध्दा चांगले आहे. असे असताना त्यांच्याकडूनही “या नव्याने उभ्या झालेल्या झाडाला (तनुश्री नामक) गुटखा किंग ” कारवाई करण्यात येत नसल्याचें दिसून येतं आहे.