●2 संशयीत पोलीसांच्या ताब्यात,अनेक कारवायांचा धडाका
अजय कंडेवार,वणी:- मागिल काही दिवसात वणी पोलीस स्टे.कडून अनेक कारवाया होतांना जनतेला दिसून येत आहे. त्यात डीबी पथक ऍक्शन मोड मध्ये आहे. त्यांनी शहरात वाढत असलेल्या अवैध धंद्यांना “ना खाणे देण्याची जणू शपथच “…..खाल्ली असल्याने अवैध धंदे वाल्याचे धाबे दणाणले आहे.तसेच त्यातीलच एक कारवाई दिनांक 07जाने.ला छत्तीसगड येथील चोरीचे वाहन वणीत पकडण्यात वणी पोलिसांना मोठे यश आले आहे, मात्र छत्तीसगढ मधील चोरीची वाहन वणीत सापडल्याने अनेक चर्चाही रंगू लागल्या आहेत.
सविस्तर वृत्त असे की,दिनांक 7 जाने 2023 रोजी एक महद्रा पिक समोरील बाजुस सीजी-11-AB-0887 व मागील बाजुस सीजी-11एबी- 0886 असे दोन वेगळे कमावर असलेले यवतमाळ रोडने वणीकडे येत असलेल्या माहितीवरून
पोलीस निरीक्षक वणी शिरसकर यांचा मार्गदर्शनाखाली सपोनि माधव शिंदे त्यांनी बाकडे पेट्रोल पंप,वणी येथे सापळा रचुन सदर वाहन ताब्यात घेवुन चालक किरण कुमार साहु व त्याचे साहु( रा. दौलतबाजार), जिल्हा सारंगड, छत्तीसगड यांची बारकाईने विचारणा केली असता, त्यांनी नमुद वाइन पो स्टेशन सर्विसा सारंगड छत्तीसगड येथून दिनांक 5जानेला रोजी चोरी केली असल्याचे सांगीतले.त्या सर्विसा पोलीस येथून फोनद्वारे माहीती घेतले असता महिंद्रा पिकअप सीजी-11-AB-0887 त्याची किंमत अंदाजे 3 लाख 50 हजार रुपये च्या संबंधाने अज्ञात आरोपी विरुदध कलम 379 नुसार गुन्हा दाखल आहे, अशी माहीती मिळाली. त्यावरून सर्विसा पोलीस स्टेशनला नमुद वाहन व आरोपी यांना ताब्यात घेतल्या बाबत माहीती देण्यात आली व सदर आरोपी व वाहन छत्तीसगड पोलिसांचा ताब्यात घेण्यात आले.सदरची कार्यवाही डॉ. पवन बन्सोड, पोलीस अधीक्षक यवतमाळ, पियुष जगताप, अपर पोलीस अधिकारी यवतमाळ, संजय पुजलवार उप. वि. पोका वणी पोलीस निरीक्षक प्रदिप शिरस्कर यांचे मार्गदर्शनात माया चाटसे सपोनि माधव शिंदे व पो. स्टॉफ स.फौ.सुदर्शन वानोळे, डोमाजी मादीकर, सुहास मंदावार, विठ्ठल बुरुजवाडे, हरिद्रकुमार भारती, पुरुषोत्तम डडमल व सागर सिडाम यांनी केली.