•ठाणेदार अजित जाधवांचा रडारावर ” तस्कर “
अजय कंडेवार,वणी:- 1 सप्टे.सकाळी 10 वाजताच्या सुमारास वणी पोलिसांनी तीन ठिकाणी धाड टाकून गोवंश कापून त्याचे मांस विक्री करणाऱ्या 3 जणांना अटक केली आहे. वणी पोलिसांनी वणी ठाणेदार यांच्या आदेशाने धडाकेबाज कारवाई केली. या सर्व विक्रेत्याकडून 550 किलो गोमांस जप्त करण्यात आले असून त्याची किंमत 82 हजार 500 रुपये आहे.Beef sellers arrested in Wani.
महाराष्ट्रात गोहत्या बंदी कायदा असताना सुद्धा काही जण कायद्याची पायमल्ली करीत काही ठिकाणी गोवंश कापून त्याचे मांस विक्री करीत असल्याची माहिती वणी पोलिसांना मिळाली. माहितीवरुन शुक्रवारी सकाळी 10 वाजताचा दरम्यान ठाणेदार अजित जाधव यांच्या आदेशावरुन पोलीसांचा ताफाच घटनास्थळाकडे रवाना झाले.
वणीतील मोमीनपुरा येथे धाड टाकली. या ठिकाणीं तिघांना अटक केली. हे सर्व जण गोवंशाची कत्तल करून त्याचे मांस विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यातच मांस विक्री हे घरातूनच करीत होते. घरामध्येच गोवंश कापल्या जात असल्याचे माहिती दिली. परंतु याकडे कुणीही लक्ष देत नव्हते.या तीन आरोपींवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1976, कलम 5 (ब) (क), 9, 9, (अ) नुसार पो.स्टे वणी येथे रितसर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई डॉ.पवन बंसोड (पोलीस अधीक्षक यवतमाळ),पियुष जगताप (अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ), गणेश किंद्रे (उप.वि.पो.अ.वणी) यांचा मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक ठाणेदार अजित जाधव यांच्या आदेशाने API दत्ता पेंडकर,PSI सुदाम आसुरे , डी. बी पथक कर्मचारी व पो. स्टे कर्मचारी यांनी पार पाडली.