•बेसिक शिक्षणाचा दृष्ठीने शहरात मॅकरून शाळा अव्वल.
•स्थळ:- गंगशेट्टीवार हॉल वरोरा रोड वणी….
अजय कंडेवार,वणी :- शहरातील हार्ट ऑफ द सिटीत एम.एस.पी.एम् ग्रुपने गंगशेट्टीवार हॉल वरोरा रोड येथे मॅकरुन स्टुडंट्स अकॅडमी सीबीएसई शाळेने आणखी एका सिटी ब्रांचचा” भव्य उदघाटन सोहळा काल दिनांक 21 जुन 2023 बुधवार दुपारी 12.00 वाजता थाटात पार पडला.Another “Macaroon City Branch” school is inaugurated in Wani….Macaroon School tops in the city in terms of basic education.

या कार्यक्रमाचे उदघाटक MSPM ग्रुपचे संचालक पी. एस. आंबटकरजी यांचे हस्ते करण्यात येणार आहे. तसेच मुख्य अतिथी वणी पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश कींद्रे होते तर विशेष पाहूणे म्हणून अभिनव भास्करवार (समाजसेवक) हे होते. या कार्यक्रमाचे आयोजक पीयूष आंबटकर ( उपसंचालक एम एस पि एम ग्रूप) व वणी सिटी ब्रांचचा मुख्याध्यापिका अश्विनी ढोले हे होत्या. या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थिती मोठ्या संख्येने पालक, शिक्षकवृंद व विद्यार्थी होते.
मॅकरून स्टुडंट्स अकॅडेमी ही शाळा वडगाव येथे असल्याने लहान मुलांसाठी पालकांचा विनंतीने प्री- प्रायमारी शाखा या चिमुकल्यांच्या शिक्षणाची व्यवस्था शहरात करण्यात यावी अशी मागणी पालकांनी केली असता MSPM ग्रुपने त्यांच्या मागणीचा मान ठेवून वणी येथील गंगाशेट्टीवार हॉल येथे नर्सरी ते 4 थी पर्यंत असणार आहे.आता हार्ट ऑफ द सिटी वणी ब्रांच येथे वणी आणखी एक विशेष शाखा येत्या सत्रापासुन सूरू होत आहे.
तसेच शहराचा” हार्ट ऑफ द सिटी ” वणी येथे प्रवेश केंद्राचा उदघाटन सोहळा संपन्न झाला आहे. या ठिकाणी लहान मुलांकरिता शिक्षणासाठी संपूर्ण भौतिक सुविधांनी सुसज्ज इमारत, खेळाचे भव्य मैदान, क्रीडा साहित्य, डिजिटल वर्ग, पिण्यासाठी शुद्ध पाणी, जेवणासाठी डायनींग हॉल, शैक्षणिक दृष्ट्या सक्षम शिक्षकवृंद, व बसची व्यवस्था सुध्दा असणार आहे . तेव्हा वणी शहर व सभोवताली पालकांनी मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी सीबीएसई प्री प्रायमरी ( सिटी ब्रांच) येथे प्रवेश निश्चित करण्याकरिता व विद्यार्थ्यांचा उज्वल भविष्याकरिता आजच प्रवेश निश्चित करा असे आवाहन येथील आयोजकांनी केले आहे.

