- नागरिकांची गैरसोय पालिका प्रशासनाने दखल घेण्याची गरज
- काम पालिकेचे खापर वाहतुक शाखेवरच का?
- “शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी जनतेने सहकार्य घ्यावे” – (वाहतूक शाखा प्रमुख A.P.I सीता वाघमारे ).
अजय कंडेवार,वणी – तालुका हा औद्योगिक क्षेत्राने व्यापलेले असल्याने वणी शहर हे मुख्य बाजारपेठ आहे .ग्रामीण भागातील जनता दररोज वणी शहराच्या बाजारपेठेत वस्तूंच्या खरेदी विक्रीसाठी येत असतात त्यामुळे बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन व्यवहार करण्याकरिता गैरसोय होत आहे .त्यातल्या त्यात पार्किंग नसल्याने बँकेच्या ग्राहकांचे सार लक्ष रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनाकडे असल्याने व्यवहारात अडथळा निर्माण होत आहे . यात मुख्य कारण अतिक्रमणही आहे.त्यामुळे शहराच्या संपूर्ण रस्त्यावर बँकांच्या समोर व दुकानासमोर वाहनांची व पायी चालणाऱ्यांची गर्दी असल्याने वाहतुकीचा खोळंबा होऊन नागरिकांची गैर सोय होत आहे. आज वणी शहरात रोज 162 गावांतील नागरिक बाजाराच्या निमित्ताने बाजारपेठेत येत असतात त्यामुळे बाजारात गर्दी होऊन वाहतुकीची कोंडी होते. सध्या नगरपालिका सुस्त दिसते आहे.कारण शहरात मोठ्या प्रमाणात बँका, दुकाने, मॉल ,टॉकीज,व इतरही व्यवसाय आहेत त्याच बरोबर मुख्य रस्त्यावर व्यवसाय थाटून बसणाऱ्यांची संख्या अधिक प्रमाणात आहे त्यामुळे नागरिकांची संख्या वाढून आर्थिक व्यवहार करण्यासाठी बँकांमध्ये गर्दी करीत असल्यामुळे व पार्किंग ची व्यवस्था नसल्यामुळे नागरिक अस्ताव्यस्तपणे वाहने उभी करून मिळेल त्या जागी वाहने उभी करत आहे त्यामुळे व्यवहार करण्याकरिता नागरिकांची गैरसोय होत आहे. आज वणी शहरामध्ये 60 ते 70 बँका ,व इतर सहकारी पतसंस्था शहराच्या मुख्य बाजारपेठेत आहे त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे व पायी चालणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे .
तर कधी कधी बँकेचे ग्राहक व दुकानदार यामध्ये बाचाबाची होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत होत आहे. तेव्हा नगर पालिकेने ज्या बँकांना पार्किंग ची व्यवस्था नाही अशा बँकांची परवानगी काढून टाकावी किंवा पार्किंग ची व्यवस्था करावी असे निर्देश देण्यात यावे जेणेकरून बाजारात वाहतुकीची कोंडी होणार नाही . नागरिकांची होणारी गैरसोय थांबविण्यासाठी मदत होईल तेव्हा नगर पालिका प्रशासनाने जातीने लक्ष घालावे व अश्या परिस्थितीत शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी जनतेने सहकार्य करावे अशी अपेक्षा वाहतूक शाखा प्रमुख A.P.I सीता वाघमारे यांनी व्यक्त केली आहे.