Thursday, March 5, 2026
HomeBreaking Newsवणीतील "ओम साई ट्रेडर्स" समोर मोपेड गाडीत खुलेआम Mazaa चे डब्बे.......!

वणीतील “ओम साई ट्रेडर्स” समोर मोपेड गाडीत खुलेआम Mazaa चे डब्बे…….!

•याच दुकानातील गुटखा विक्री व्हिडिओ झाला होता व्हायरल. •प्रशासनाला "पूरण" वर खूपच गप्प प्रेम म्हणून अद्यापही कारवाई शून्य?

Ajay Kandewar,Wani:- मागील महिन्यात वणी येथील जुना बस स्टँड सिंधी कॉलोनितील मनोहर बार समोरील “ओम साई ट्रेडर्स” या दुकानात मोठ्या प्रमाणात बाजीराव ,गूगल सुपारी, व mazaa डब्बे विकत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला .ही बाब अतिशय हानिकारक असून मानवी जीवनाला धोकादायक ठरणारी बाब आहे. यावर संबंधित विभागाने लक्ष देणे तर सोडाच कारवाई करण्यास धजावत नाही याचं स्पष्ट आणखी एक उदाहरण “ओम साई ट्रेडर्स” समोर मोपेड गाडीत खुलेआम Mazaa चे डब्बे ठेवून विकत असल्याचं भयावह प्रकार उघडकीस आला. यावरून स्पष्टरित्या फूड विभागाचं आशिर्वाद आणि प्रशासनाच” कानडोळा” हेच आहे. यावर वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे झाले आहे. कारण तंबाखू तस्करांची मुजोरी वाढल्याच चित्रं स्पष्ट आहे.

या माजलेल्या “पूरण” नामक तंबाखू तस्करावर कोणत्या पांढरपोशीच हात असल्यान “त्याची” “मस्ती”झिजविणे गरजेचे आहे. कारण आता तर या दुकानात सर्रास खुलेआम “Mazaa “चे डबे दुकानात तर सोडा “मोपेड गाडी” भरगच्च पोते ठेवून प्रत्येकी एकाला बोलावून तंबाखू देत असल्याची चर्चा सुद्धा या भागात रंगू लागली आहे. आता झोपलेल्या प्रशासनानं शासकीय धर्म समजून मोठी कार्रवाई होणे गरजेचे आहे आणि या मुझोर “पूरण ” नामक मुसक्या आवळून “जेल की हवा ” एकदा दाखविणे गरजेचे आहे. प्रशासन पुढे काय कारवाई करते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

बघा हाच तो फोटो….

•मोपेड गाडीतून येतो गुटखा ..

येथून मोपेड दुचाकी या वाहनातून दिवसभरात सात ते आठ फेऱ्यांमध्ये जवळपास 20 पोती गुटखा शहरात येतो.त्याचे दुचाकी आटोने तालुक्याच्या विविध भागांत वितरण केले जाते असल्याचं आता बोलल्या जात आहे. 

जाणीवपूर्वक दुर्लक्ष…

अन्न, औषधी प्रशासन विभागाने गुटखा विक्रीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे सर्रास विक्री सुरू आहे. प्रत्येक चौकात पुड्या मिळतात. हे संबंधित विभागाला दिसत नाही. – मनोज सवई (वणी नागरिक)

•ही सामाजिक हानी…..

गुटख्यामुळे भावी आधारस्तंभ असलेल्या तरुण पिढीचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणात वाढत असून, युवा िपढी गारद होत आहे.ही मोठी सामाजिक हानी आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page