अजय कंडेवार, वणी :- पारसमल प्रेमराज ज्वेलर्स प्रस्तूत T-10 चॅम्पियन्स लीग वणीचा पहिल्या ऐतिहासिक पर्वासाठी टीम व खेळाडूंचा लिलाव दिनांक 8 सप्टेंबरला होत आहे. या मेगा ऑक्शनसाठी सर्व फ्रँचायजींमध्ये आणि सहभागी खेळाडूंमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.पहिल्याच मोसमासाठी ( T-10 चॅम्पियन्स लीग 2022) साठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. या पर्वासाठी क्रिकेट टीमसह चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
दरम्यान या मोसमाआधी पुढील म्हणजेच ऐतिहासिक पहिल्याच हंगामांची (T-10 चॅम्पियन्स लीग 2022) चर्चा रंगू लागली आहे. त्याचं कारणही तसंच आहे. हंगामात 10 टीम खेळताना दिसणार आहेत. याबाबतची माहिती ऍड. कुणाल चोरडिया यांनी दिली आहे.
या लिलावात एकूण 18 टिम सहभागी होणार आहेत. त्यापैकी केवळ 10 टीमचीच यात निवड करण्यात येणार आहे. यामुळे कोणते खेळाडू नशिबवान ठरणार, कोणाला किती रक्कम मिळणार, यासाठी खेळाडूंमध्ये तसेच चाहत्यांमध्ये जितकी उत्सुकता आहे, तेवढीच धाकधूकदेखील आहे. दरम्यान हा लिलाव प्रक्रियेचा कार्यक्रम श्री विनायक मंगल कार्यालय छोरिया टाऊनशिप वणी येथे सायं ठीक 7 वाजता सुरुवात होणार आहे.