•सजय खाडे यांच्या संकल्पनेंतून सामान्यजनतेनी अनुभवला ऐतिहासिक क्षण.
अजय कंडेवार,वणी:- विविध रंगी, देखण्या आणि चपळ बैलजोड्या हवेच्या वेगाने निर्धारित १०० मीटरचे अंतर पार करीत होत्या. त्यांच्या धावण्याचा वेग सुसाट वाऱ्यासारखा होता. डोळ्याची पापणीही लवणार नाही इतक्या वेगाने ती जोडी निर्धारित अंतर पार करीत होती. हा थरारक अनुभव आपल्या डोळ्यांत साठविण्यासाठी वणीतील व आजूबाजूचा खेड्यातून आलेल्या नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. वेगाने धावणाऱ्या ‘अ’ गटातील सर्व बैलजोड्यांचे रेकॉर्ड करोडी येथील मनोहर चव्हाण यांच्या लखना – जलवा जोडीने अवघ्या ६ सेकंद ५७ पॉइंटमध्ये अंतर पार करीत या जोडीने सर्व रेकॉर्ड मोडून काढले. ही जोडी ‘विदर्भ केसरी जंगी शंकरपट पुरस्कारा’तील पहिल्या क्रमांकाची मानकरी ठरली.या जोडीला १ लाख रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस, स्मृतिचिन्ह आणि शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.Wani’s “Lakhna-Jalwa” pair winner in Shankarpatat.
वणी मतदारसंघातील जय जगन्नाथ मल्टीस्टेट क्रेडिट को- सोसा,वणी बँकेचे अध्यक्ष संजय खाडे यांचा संकल्पनेतून स्व .बाळूभाऊ धानोरकर यांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूने शंकरपटाचे विदर्भ केसरी जंगी शंकरपटाचे आयोजन ता.२० फेब्रुवारी ला करण्यात आले होते. या स्पर्धेत तीन दिवसांत २५७ जोड्या धावल्या.
या जत्रा मैदानातील विदर्भ केसरी जंगी शंकरपटात सहभागी होण्यासाठी राज्यातल्या काेनाकोपऱ्यातून यवतमाळात बैलजोड्या दाखल झाल्या होत्या. मैदानात सुरू असलेल्या जंगी शंकरपटात हौशीची अमाप गर्दी होती. विदर्भ, मराठवाडा, मध्य प्रदेशातून सुद्धा बैलगाडा शर्यत प्रेमींनी सहभाग नोंदविला आहे.तीन दिवसांत या ठिकाणी दाखल झालेल्या बैलजोड्यांपैकी २५७ बैलजोड्यांनी प्रत्यक्ष शर्यतीत सहभाग नाेंदविला होता. शंकरपट पाहण्यासाठी वणी उपविभागातुन आलेल्या नागरिकांनी अखेरच्या दिवशी मोठी गर्दी केली होती. प्रत्येक क्षणाला ही स्पर्धा उत्कंठा वाढविणारी राहिली. शंकरपटाचा पहिल्याच दिवशी “गावगाडा स्पर्धेत” रांगणा येथील शेतकरी गुणवंत वांढरे यांच्या तेजा व वायफर या जोडीने अवघ्या 8.1 सेकंदात अंतर कापत पहिला क्रमांक पटकावला. या स्पर्धेचे राजूर इजारा येथील भाविका मिलमिले व गणेशपूर (वणी) येथील कु. राधा बोबडे या दोन तरुणींनी सहभाग घेतला होता. राधा हिने मैदान गाजवत अवघ्या ८.३३ सेकंदात अंतर कापत पाचवा क्रमांक पटकावला. या दोन्ही तरुणीच्या जिद्दीचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले.
गावगाडा शर्यतीत मुख्य ३ बक्षिसे होते तर ,’अ ‘ गटातून १३ बक्षिसे व ‘क ‘ गटातून १३ बक्षिसे असे एकूण २९ बक्षिसे देण्यात आले. त्यात मनोहर पाटील चव्हाण (करोडी ) यांच्या लखना- जलवा या जोडीने अवघ्या ६ सेकंद ५४ पॉईंट या वेळेत अंतर पार करीत एक लाखाचे बक्षीसाचे पहिले मानकरी ठरले, दुसरे साहेबराव पाटील (हिवरा) लक्ष्या ७७९७- चणा ६ सेकंद ५९ पॉईंट मिळवित या जोडीने ७१ हजार रुपये बक्षीस मिळविले व अशोकराव पाटील (धारफळ) बजरंग-वंची या जोडीने ६.६७ पॉईंट मिळवीत ५१ हजार रुपये बक्षीस प्राप्त केले तसेच “क ” गटात भव्या अमोल पवार (दहिवड) ६.७९ मध्ये जलवा- सैराट या जोडीला पहिला मान मिळाला त्यात ४१ हजार रुपये बक्षीस, स्मृतिचिन्ह आणि शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.व दुसरे मानकरी नवनाथ महाराज प्रसन्न (वडगाव) ६.५५ हिरा – शेवा या जोडीला ३१ हजार रुपये बक्षीस व राम चव्हाण (घोंगशीकांडा) ६.९० बलमा- नंद्या या जोडीला २१ हजार रु.तिसरे बक्षीस देण्यात आले तसेच तसेच उर्वरित विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम आणि स्मृतिचिन्हांसह गौरविण्यात आले.
विदर्भ केसरी जंगी शंकरपट कार्यक्रमाचें बक्षिस वितरण करतांना वरोरा-भद्रावती मतदार संघाच्या विद्यमान आमदार प्रतिभाताई धानोरकर, माजी आमदार हिंगणघाट राजू तिमांडे ,जय जगन्नाथ मल्टीस्टेट क्रेडिट को सोसा.वणी बँकेचे अध्यक्ष संजय खाडे,अध्यक्ष रंगनाथस्वामी नागरी सह पतसंस्था देविदास काळे, प्रा.शंकर व-हाटे, नरेंद्र ठाकरे, राजा पाथ्रडकर, अरूणाताई खंडाळकर आदि आयोजन समितीचे सर्व सदस्यगण व ईश्वर खाडे, धनंजय खाडे व खाडे मित्रपरिवार उपस्थित होते.
” शंकरपटात श्रुती वाळवे रा. वाढोणा जि. अमरावती या युवतीने सहभाग घेतला. तसेच स्वतः धुरकरी होऊन जोडी हकलली. हा चित्तथरार हजारो नागरिकांनी पाहिले व मान्यवरांच्या हस्ते या युवतीचा सन्मानही करण्यात आले.”