•ट्रकने 60 वर्षीय महिलेला चिरडले.
अजय कंडेवार,वणी:- तालुक्यातील उत्तम भोंगळे दांपत्य वरोरा या दिशेकडे जात असतांना पाठीमागून येणाऱ्या ट्रकने जबर धडक दिली असता मागें बसून असलेल्या महीलेचा तोल जाऊन पडली असता , बायपास रोड वरील वडगाव फाट्याजवळ सकाळीं 10.30 वाजताचा दरम्यान भरधाव ट्रकने 60 वर्षीय महिलेला चिरडले.
सदर घटनेत मृतक महिलेचे नाव छबुताई उत्तम भोंगळे (वय 60) रा.रवि नगर, वणी.ती महीला दुचाकीने (क्र- MH -29BW -1749) पतीसोबत वरोरा या दिशेकडे जात असतांना बायपास वडगाव फाट्यावर दुचाकीचा मागचा बाजूने येत असलेल्या ट्रकने धडक दिली.दुचाकीवरील मागें बसून असलेल्या महीलेचा धडकेने तोल जाऊन पडल असता मागून येणाऱ्या ट्रकचे चाक पडलेल्या अक्षरशः महिलेचा डोक्यावरून ट्रकचे चाक गेले. त्यावरून जागेवरच त्या महिलेचा डोक्याचे चेंदामेंदा झाला.
घटनास्थळी प्रथमदर्शीयांनी तात्काळ पोलिसांना फोन करून माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह वणी ग्रामीण रुग्णायात उत्तरीय तपासणीकरीता पाठविण्यात आले. पुढील तपास वणी पोलिस करीत आहे.
“वडगाव रस्त्याचा डाव्या बाजूला धूळ साचलेलली आहे. दूचाकीवर प्रवास करतांना तो रस्ता घातक ठरताहेत. यात माञ शंका नाहीं.”