•आरोपी अद्यापही फरार, पोलीसांना अपयश ?
•जखमी युवकाचे नागपूर येथे उपचार सुरू पण प्रकृती अतिशय गंभीर..
अजय कंडेवार,वणी : शहरातील शिवाजी पार्क परिसरात दोन युवकांचे काही युवकांमध्ये जबरदस्त राडा त्यात एका युवकाला लोखंडी रॉडने जबरदस्त मारहाण केली. यात युवक गंभीररित्या जखमी झाला. ही घटना रविवारी ( 9. एप्रिल) रोजी रात्री घडली.The youth was brutally beaten with an iron rod..accused still absconding, failure of the police?
सविस्तर,राकेश शंकर शेवंतावार (वय २७) रा. शास्त्रीनगर असे जखमीचे नाव आहे. समीर मून (वय २७) व अरुण तिराणकर (वय २६) या दोघांनी राकेशला व त्याचा सहकाऱ्यांना जुन्या वादातून मारहाण केली. परंतु त्यात जास्त जखमी अवस्थेत असलेला युवक राजु महादेवराव जगडमवार अंदाजे वय (35) व कुणाल बुरेवार या युवकांना जबरदस्त मार अस सांगितले जात आहे.त्यातील राजू जगडमवार या युवकावर चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहीती आहे. विशेष या युवकाची घरची परिस्थितीही अत्यंत हालाखीची असल्याचे बोलल्या जात आहे.त्याला त्या उपचाराकरिता आर्थिक परिस्थिती देखील नसल्याची खळबळजनक माहीती समोर येत आहे.
याप्रकरणी समीर मून व अरुण तिरांकर या दोघांविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. सद्य स्थितीत दोन्ही आरोपी अद्याप फरार असून पोलीस या दोन्ही आरोपींचा शोध घेण्यात अपयश आले आहे. पोलिसांपुढे त्या दोन आरोपींना शोधण्याचे आवाहनही उभे ठाकले आहे. पोलिसांना त्यांचें मुसके आवळण्यात कधी यश येइल हे आता बघणे गरजेचे….!