• राजूरकरीता आणखी 3 कोटी देण्याचा प्रयत्न.
अजय कंडेवार,वणी:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून (Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar Social Development Scheme) अनुसूचित जाती (Scheduled Castes) वस्तीतील विकास कामांसाठी (development workrs) आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार (MLA Bodkurwar) यांच्या प्रयत्नातुन दिवाळीपूर्वीच 33 विकास कामांचा धडाका ग्रामीण भागात केला आहे.त्यामध्ये तिन्ही तालुक्यातील अनेक गावांचा समावेश आहे. या 5 कोटींचा विकासकामात सिमेंट रस्ते, डांबरी रस्ते, काँक्रीट व बंदिस्त गटार, हायमास्ट दिवे, एलईडी दिवे, समाज मंदिर दुरुस्ती, पाणीपुरवठा पाईपलाईन आदी कामांचा समावेश आहे व राजूर गावाकरीता”विशेष निधीतून” तब्बल 2 कोटींचा निधी मंजूर (Funding approved) झाला आहे. याबाबत आमदार बोदकुरवार यांनी दिक्षाभुमी बुध्द विहार कमेटीचे अध्यक्ष व सचिव यांना लेखीपत्र दिलें. मुख्यत्वे हा निधी दीक्षाभूमीचा संरक्षणभिंत व बांधकामाकरीता देण्यात आला आहे. परंतू राजूरकरीता आणखी 3 कोटी देण्याचा प्रयत्न असेल असंही आश्वासन देण्यात आले.
आमदार बोदकुरवार हे राजुर येथील बुद्धविहार कमिटीला पत्र देताना क्षणचित्र…
अनुसूचित जातींच्या वस्त्यांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण विकास कामे करण्याची मागणी आ. बोदकुरवार राजूर गावांतील सरपंच, काही ग्रा.पंचायत सदस्य,बुद्धविहार कमिटी व ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य या विभागातून अनुसूचित जाती वस्तीतील कामे मंजूर होण्यासाठी संजिवरेडी बोदकुरवार यांनी मागणी केली होती. त्यानंतर सतत दोन वर्षापासून पाठपुरावा करण्यात आला. व राज्य शासनाने नुकतेच या कामांच्या प्रशासकीय 5 कोटींची मंजुरीचे आदेश दिले आहेत. त्यात आमदार यांनी राजूर येथील समाजभवन लोकार्पण सोहळ्यात दिलेल्या शब्दाचा मान ठेवत तब्बल आलेल्या 5 कोटींचा निधीपैकी “विशेष निधीतून” 2 कोटी मंजुर करण्यात आले.
तर अनेक ग्रामीण भागात विकास कामांकरीता निधी मंजुर करण्यात आला आहे. त्यात पुरड, चिलई, पिंपरी कायर, तेजापुर, आमलोन, राजुर इजारा, नांदेपेरा, बोरगांव, लालगुडा, बेलोरा, कवडशी, मांजरी, शिरपुर, चिखली, येणक, चेंडकापुर तर धानोरा, मांगली, सतपल्ली, राजुर गोटा, मुकूटबन, लिंगटी, बोपापुर, बाळापुर ,मार्डी, बमर्डा, हिवरा, देवाळा, बोटोणी, वनोजा देवी या गावाकरीता निधी मंजुर करण्यात आला.