•शाळेचा 97 टक्के निकाल.
•”युक्ता ” विज्ञान शाखेतून वणी तालुक्यात अव्वल… हे विशेष.
अजय कंडेवार,वणी :- लायन्स कनिष्ठ महाविद्यालयाचा एच.एस.सी फेब्रुवारी २०२३ मध्ये ९७.२९ टक्के लागला असून कु.युक्ता प्रमोद बैद हिने ८९.८३ टक्के गुण प्राप्त करून कनिष्ट महाविद्यालयातून प्रथम येण्याचा मान पटकाविला.From Lions College “Mukta.. “First…! 97 percent school result.
फेब्रुवारी २०२३ एच.एस.सी परिक्षेसाठी एकूण ७४ नियमित विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली त्यापैकी ७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये गुणानुक्रमे कु.युक्ता प्रमोद बैद प्रथम,कु. अनया दिलीप कोटरंगे द्वितिय, कु.आवल गजानन दोडके तर कुमेन्द्र चौरासी कु. अल्फीया एजाज पठाण या विद्यार्थ्यांनी बाजी मारली.
विद्यार्थीच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष लायन शमीम अहेमद, उपाध्यक्ष लायन डॉ. के आर लाल, सचिव लायन महेंद्र श्रीवास्तव, कोषाध्यक्ष लायन रमेश बोहरा, संचालक लायन डॉ.आर डी. देशपांडे, लायन सुधीर दामले, लायन चंद्रकांत जोबनपुत्रा, लायन बलदेव खुंगर लायन मंजीरी दामले, प्राचार्य प्रशांत गोडे, दिपासिंह परीहार व शिक्षकांनी अभिनंदन केले.