•लाभार्थ्यांची गटविकास अधिकारी यांचाकडे तक्रार
•राजुर (गोटा) येथील प्रकरण.
देव येवले (झरी-जामणी) :- राजुर (गो) येथील लाभार्थी खुशाल दामोदर गावंडे व मोहन गणपत राऊत यांनी नरेगा अंतर्गत गुरांच्या गोठ्याचे बांधकाम केले. त्याचे पैसे दि.५ एप्रिल २०२२ रोजी ग्राम पंचायतच्या खात्यामध्ये जमा झाले. याबद्गल लाभार्थ्यांना माहिती मिळाली. त्यामुळे सचिवांना विचारणा केली असता सचिवांकडून उडवाउडवीचे उत्तर दिले.
सर्वात आधी सचिवांनी चेकबुक नसल्याचे कारण सांगितले. चॉर्ज घेऊन ३ महिने होत असतानासुद्धा सचिवांनी बँकेकडे चेकबुकची मागणी केली नसेल का? असा प्रश्न उपस्थित होते. केली नसतील तर का नाही केली? चेक देण्यास टाळाटाळ बद्दल लाभार्थ्यांनी गटविकास अधिकारी व सचिवांची आमदारांकडे तक्रार केली. तक्रार प्राप्त होताच गटविकास अधिकारी यांनी सचिवाला विचारणा केली असता, केवायसीचे अर्ज सादर करून २ महिने झाले, तरी त्याची प्रक्रिया झालेली नाही असे कारण सांगितले. नंतर गटविकास अधिकारी यांनी बँकेकडे विचारणा केली, तर अर्ज सादर करून केवळ २ दिवस झाले असल्याचे उत्तर बँकेकडून मिळाले. त्यानंतर गटविकास अधिकारी यांनी सचिवाला आपल्या कार्यालयात बोलावले असता, लाभार्थ्यांना चेक दिला आहे आणि हे प्रकरण मिटले असल्याचं सांगितल्या गेलं, असं लाभार्थ्यांना कळलं.
परंतु प्रत्यक्षात मात्र अद्यापही लाभार्थ्यांना चेक देण्यात आला नाही. अशाप्रकारे एक ना अनेक कारण पुढे करत सचिव संबंधित लाभार्थ्यांना हुलकावणी देत आहे. त्यानंतर लाभार्थ्यांनी गटविकास अधिकारी यांचेकडे संबंधित प्रकरणाची चौकशी करून योजने अंतर्गत मिळणारा लाभ त्वरीत देण्यात यावी कोणतीही कार्यवाही न झाल्यास आपल्या कार्यालयापुढे आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.