★महावितरणचा भोंगळ चव्हाटयावर, अधिकारीही निद्रावस्थेत
•कधी कधी रात्रभर राहावे लागते अंधारात…
अजय कंडेवार,वणी:- गेल्या काही दिवसांपासून राजूर परिसरात कोणत्या ना कोणत्या कारणाने वारंवार वीजपुरवठा खंडित होतो आहे.विशेषतः पावसाळा असल्याने दिवसेंदिवस या प्रकारात आणखी वाढ हाेत असल्याने वारंवार खंडित हाेत असलेल्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याचा पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे. तसेच वारंवार वीजपुरवठा कधीही खंडित होत असल्यानं “मुजोर लाईनमनला” वारंवार फोन करून बोलवावे लागते त्यातही उपायोजना शून्य होत असल्याने माजी सरपंच प्रणिता अस्लम, ग्रामपंचायत सदस्य व समस्त ग्रामस्थांनी महावितरण विभागाचा मुख्य अभियंत्याला निवेदन देत राजूर सबस्टेशनला नियुक्ती करण्यात आलेला “तो मुजोर लाईनमन”गावात उपलब्ध असलाच पाहिजे अशी मागणी केली आहे.
राजूर गावात नेहमीच थोड वारा आला की हलका पाऊसही आल्यास विद्युत पुरवठा बंद होतो.दिवस-रात्र असा प्रकार सुरू असल्याने मोठ्या नागरिकांसह लहान मुलेसुद्धा पंख्याअभावी झोपत नाही. त्यामुळे मुलांच्या आईला रात्रीची झोपमोड करून लहान मुलांना मायेच्या पदराचा वारा घालावा लागतो. विद्युत पुरवठा बंद होत असल्याने परिसरातील नागरिक कंटाळले. राजूर येथील महावितरणच्या कारभाराला कंटाळले असुन देण्यात येते व या परिसरातील शेतकरी व मजूरवर्ग दिवसभर कामे करतात राबतात आणि त्यांना रात्र अंधारात काढावी लागते. त्यातच लहान मुले व वृद्धांना याचा खूप त्रास करावा लागतो. विद्युत पुरवठा त्वरित दुरुस्त करता येऊ शकतो, मात्र राजूर गावात (सबस्टेशन) मुख्यालय असून सुद्धा लाईनमन पूर्णवेळ उपस्थित राहत नाही असाही स्पष्ट आरोप आहे.
कधी कधी गावकऱ्यांना अंधारातच रात्र काढावी लागते.तरीसुद्धा विद्युत कंपनीकडून नागरिकांना रिडिंगपेक्षा जास्त बिल येत असते.मात्र, मेंटेनेन्स भोंगड़ कारभारच्या नावखाली अद्यापही काम पूर्ण झाले नाही. याचा त्रास गावकऱ्यांना भोगावा लागते. सदर गावाची प्रशासनाने दखल घेऊन घ्यावी व मुजोर लाइनमनला गावातुन त्वरित हकालपट्टी करा नाहीतर मुख्यालयी कायमस्वरूपी उपलब्ध करा, जेणेकरुन गावातील समस्याकडे लक्ष देता येणार. या बाबत प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन गावातील जनतेच्या विद्युतखंड बाबतिचा प्रश्न निकाली लागेल अशी जनतेकडून आर्त हाक दिसून येत आहे.
यावेळी निवेदन देताना प्रणिता मो.अस्लम(माजी सरपंच तथा ग्राम.प.सदस्य),बबिता सिंग,रेहाना सिद्दीकी दिशा फुलझेले ,अमर तितरे,ओम चिमूरकर,अमृत फुलझले व अभय सुरशे उपस्थित होते.