Tuesday, July 15, 2025
Homeवणी"लक्ष्मीनारायण पतसंस्थेचा"असाही एक वर्धापन.....!

“लक्ष्मीनारायण पतसंस्थेचा”असाही एक वर्धापन…..!

•संस्थाचालकाने दिला वृक्ष संवर्धनाचा मूलमंत्र.

अजय कंडेवार, वणी:- लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्था वणीचा प्रथम वर्धापन दिवस आज दि.5 मे. रोजी थाटात साजरा करण्यात आला .याप्रसंगी सर्व अभिकर्त्यांना व कर्मचाऱ्यांना व उपस्थित सभासदांना प्रत्येकी ‘एक झाड वाटप करून झाड लावण्याचा व वृक्ष संवर्धनाचा मूलमंत्र देण्यात आला.Anniversary of Lakshminarayan Patsanstha… The director of the institution gave the basic mantra of tree conservation.

लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्था गेल्या एक वर्षात मोठ्या प्रमाणात आर्थिक क्षेत्रात गगन भरारी घेतली असून ही संस्था सर्वांचा विश्वास कायम करून कमी वेळात नावलौकिक केला आहे.विविध सामाजिक उपक्रम राबवून पारदर्शक व्यवहार व सर्वसामान्य जनतेला शेतकरी व महिला बचत गटांना सुद्धा आर्थिक प्रगतीचा हातभार लावण्यासाठी ही संस्था गेल्या एक वर्षापासून सतत काम करत आहे त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी व्यापारी उद्योजक व गरजू लोकांना पतपुरवठा करून त्यांचा व्यवसायाला मोठा हातभार लावत आहे त्यामुळे या पतसंस्थेचा कारभार पाहता सर्वसामान्यांमध्ये कमी वेळात मोठी प्रगती करणारी एकमेव पतसंस्था म्हणून नावलौकिक आले आहे.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष संगीता खाडे, संस्थेचे संचालक संजय खाडे ,ईश्वर खाडे व इतर पदाधिकारी अभिकर्ते,कर्मचारी व सभासद उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments