अजय कंडेवार, वणी:- तिसरा सामना हा अतिशय महत्वाचा होता कारण या सामन्यात जो संघ जिंकणार त्याला फायनलमध्ये प्रवेश मिळणार होता. हा सामना जन्नत 11 विरुद्ध रेनबो क्रिकेट क्लब यांच्यात खेळल्या गेला. रेनबो संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरला.
रेनबो संघाकडून सुमित ठाकूरवार 15 धावा करून बाद झाला. नंतर 10 व्या क्रमांकाचा खेळाडू सारंग मातनकर याने 14 धावा केल्या. रेनबो संघाचा कोणताच खेळाडू खेळपट्टीवर अधिक काळ टिकला नाही. रेनबो संघाने 8 बाद 59 धावा केल्या. 60 धावांच्या लक्षचा पाठलाग करतांना जन्नत संघाचा कर्णधार सेनापती अक्षय धावंजेवार उर्फ पेंटर याने 18 चेंडूत 2 चौकार व 3 षटकार हाणत 34 धावा केल्या. त्याला साथ मिळाली ती प्रणय शेंडे यांची त्याने 18 चेंडूत 21 धावा केल्या. हा सामना जन्नत संघाने अगदी सहजपणे 8 गडी व 2.5 षटक राखून पूर्ण केला.
आता…फायनलमध्ये होणार जन्नत 11 व आमेर संघात यांच्यात लढत