Tuesday, February 17, 2026
HomeUncategorizedरेती माफियांचा वणी बनला हॉटस्पॉट... 

रेती माफियांचा वणी बनला हॉटस्पॉट… 

•सर्व घाट बंद… तरीही शहरात वाहतूक धडाक्यात. • एका साहेबांचा एक खास वसूलीवाला ' रेती तस्कर' कोण?

Ajay Kandewar, Wani :वणी परिसरातील सर्व वाळूघाट उपशासाठी अधिकृतरीत्या बंद असताना शहरात दररोज पिकअप, ट्रॅक्टर, हायवा आणि ट्रकद्वारे मोठ्या प्रमाणात वाळूची आवक सुरूच आहे. शहरातील रस्त्यांवर पडलेली रेती, बांधकामस्थळी पोहोचणारे ट्रक आणि रात्री-अपरात्री फिरणारी वाहने हे सर्वसामान्यांना दिसत असतानाही महसूल विभाग गेल्या महिनाभरात पूर्णतः निष्क्रिय राहिल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. परिस्थिती अशी आहे की जणू सर्वत्र वाळू उपसा सुरु आहे, पण कागदोपत्री मात्र घाट बंद; हे विरोधाभासी चित्र प्रशासनावरच गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे.

वाहतुकीदरम्यान पडलेल्या वाळूवर चालकांकडून चंद्रपूर जिल्ह्याचा परवाना असल्याचा दावा केला जात असला तरी त्या परवान्यांची सत्यता तपासण्यात महसूल विभाग पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसत आहे. वणीत येणारी वाळू प्रत्यक्षात कुठून येते, तिचा स्त्रोत काय आहे, परवाना खरा की खोटा, घरमालकांनी मागवलेली रेती कायदेशीर आहे की नाही, याबाबत कोणतीही तपासणी न होणे हेच या संपूर्ण प्रकरणातील संशयाचे मूळ ठरत आहे. नागरिक स्पष्टपणे सांगत आहेत की शहरात पडलेल्या रेतीची व्यवस्थित चौकशी झाली तर मोठे रॅकेट उघडकीस येईल, पण महसूल विभाग या चौकशीपासून जाणीवपूर्वक दूर राहतोय असे चित्र तयार होते आहे.

सर्व वाळूघाट बंद असूनही शहरात मोठ्या प्रमाणात वाळू पोहोचत आहे, पडलेल्या रेतीची चौकशी होत नाही, परवान्यांची पडताळणी होत नाही आणि महसूल विभागाची उपस्थितीदेखील जाणवत नाही—या परिस्थितीत शहरातील अवैध वाळू वाहतुकीचा संपूर्ण खेळ कोणाच्या संरक्षणाखाली सुरू आहे, हा प्रश्न आता अधिक तीव्र झाला आहे. नागरिकांनी महसूल पथकाने तात्काळ हालचाल करून शहरात येणारी वाळू, पडलेल्या रेतीचा स्त्रोत आणि संबंधित वाहनांचे परवान्यांची तपासणी करावी, परवानगी नसलेली रेती ताबडतोब जप्त करावी आणि या संपूर्ण रॅकेटमधील DETAIL तस्करासह सर्व संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी कडाडून मागणी केली आहे.वणीमध्ये अवैध वाळू वाहतुकीचा उच्छाद वाढत असतानाच महसूल विभागाचा मौन अधिकच संशयास्पद ठरत असून, या प्रकरणाचा स्फोट कधीही होण्याची शक्यता नागरिक व्यक्त करत आहेत.

वणी शहरात सध्या एका गोष्टीचीच प्रचंड चर्चा……

एका विभागातील एका साहेबांचा एक खास रेती तस्कर” रोजच्या रोज शहरात वाळूचा मोठा पुरवठा करतो आणि त्यामुळेच कोणतीही कारवाई होत नाही. हा तस्कर रात्री-दिवसा निर्भयपणे वाहतूक करतो, पिक अप,ट्रक-हायवा,ट्रॅक्टर शहरात येत-जात राहतात, पण त्यांच्यावर तपासणी करण्याची हिंमत महसूल पथकामध्ये दिसत नाही. शहरातील नागरिकही आता थेट प्रश्न विचारत आहेत की हा तस्कर एवढा मोकळा कसा फिरतो आणि त्याला कोणाचा हातशीट लाभतो? जर अधिकारी निष्पक्ष असतील तर महिनाभरात एकही कारवाई का झाली नाही, हीच नागरिकांची ठाम भूमिका आहे. आणि हा रेती तस्कर “त्या साहेबांची ” वसुली करतो अशी सुद्धा खमंग चर्चा आहे.त्या एका रेती तस्कराविरुद्ध अनेक गुन्हे नोंद आहेत. तसेच तो एका मोठ्या राजकीय पुढाऱ्याचा ‘फेव्हरेट’ मानला जात असल्याने “त्याचे काहीही बिघडू शकत नाही” या भ्रमात तो सातत्याने वावरत आहे. या तस्कराचा भूतकाळही काहीसा संशयास्पद असून त्याचा एक जिवलग सोबती काही वर्षांपूर्वीच त्याच्यापासून दूर झाला. आजगत तो सोबती शांत, सुसंस्कृत आणि समाधानी जीवन जगत असताना, संबंधित व्यक्ती मात्र अद्यापही अवैध रेती तस्करीच्या सावलीतच रममाण आहे. अशी वणी शहरात बोंब आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments