•भरारी पथक अँक्शन मोडमध्ये ,पुन्हा एक कारवाई..
माणिक कांबळे /मारेगाव :- वर्धा नदीवरील आपटी दांडगाव घाटावर गेल्या काही दिवसा पासून अवैध रेतीचा उपसा सुरु आहे.या घाटावर जवळपास 15-20ट्रक्टर चोरट्या मार्गाचा वापर करीत रेतीची तस्करी करीत आहे.याबाबत ची कुणकुण लागताच भरारी पथकाने दी.19.जुन. मध्यरात्री धाड टाकली असून घटनास्थळा वरून एक ट्रक्टर जप्त करण्यात पथकाला यश आले आहे.The sand smugglers’ dhaba was shaken.•Bharari squad in action mode. Another action
शासनाने रेतीघाट लिलाव न केल्यामुळे रेती तस्करीला उधाण आले आहे. वर्षभर या रेतीघंटावरून अवैध रेतीचा उपसा सुरु असताना ठोस उपाय योजना करण्यात आली नव्हती. त्यामुळे रेती तस्करीला अच्छे दिन आले होते. नुकतेच रुजू झालेले तहसीलदार यु. एस. निलावाड, नायब तसीलदार अरुण भगत मंडळ अधिकारी अमोल घुगाने तलाठी शिंदे,यांनी चोरट्याच्या मागावर पाळत ठेवून ही कारवाई कोसारा घाटावर करण्यात आली आहे.
संतोष चिनन्ने असे रेती चोरट्याची नाव आहे.हा ट्रॅक्टर तहसील कार्यालयाच्या आवारात जप्तीत ठेवण्यात आला आहे.नव्याने रुजू झालेले तहसीलदार निलावाड यांच्या या दुसऱ्या धडक कारवाईमुळे रेती तस्कराचे धाबे दनानले आहे.