•शिरपूर पोलिसांचा दोन वेगवेगळ्या ठिकाणी बेधडक कारवाई.
अजय कंडेवार,वणी:- तालुक्यातील शिरपूर स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पैनगंगा नदी पात्रातील अवैधरित्या बिना रॉयल्टी रेतीचोरी करून वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर चा पाठलाग शिरपूर पोलिसांनी केला असता त्यातील दोन्ही ट्रॅक्टरचा मालक,चालकाविरुद्ध शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये ता.18 शनिवार रोजी रात्रीचा सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला.
तालुक्यातील शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत (shirpur police station ) पैनगंगा नदी पात्रातील अवैधरित्या वाळू (Sand) उपसा करुन वाहतूक करीत असताना( ता.18 ) शनिवार रोजी शिंदोला माईंन्स जवळील गोवारी पारडी व कूरई येथील गणपती मंदीर अश्या वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकत 2 ट्रॅक्टर जप्त करीत 2 आरोपींना ताब्यात घेत 11 लाखाचा वर मुद्देमाल शिरपूर पोलिसांनी (Shirpur Police) जप्त करीत बेधडक कारवाई केली.अवैधरित्या वाळू वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना (Police)गुप्त खबऱ्याद्वारे मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून शिरपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शनिवार (दि.18) रोजी रात्री 9 वाजताचा सुमारास पैनगंगा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे 2 ट्रॅक्टर वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकत ताब्यात घेतले आहे.यावेळी पोलिसांनी चालकांकडे वाहतुकीचा (Transport) परवाना मागितला असता त्यावेळी कोणताही वाहतुकीचा परवाना दोन्हीं ठिकाणी चालकांकडे आढळून आला नाही. ठाणेदार संजय राठोड यांनी थेट दोन्हीं ट्रॅक्टर यांचा ठाण्याकडे मोर्चा वळविला आणि बेधडक कारवाई केली.
यावेळी शिरपूर पोलिसानी एक महिंद्रा ट्रॅक्टर कि. अंदाजे 6 लाख रू, एक जॉन धीर कंपनी ट्रॅक्टर किं.अंदाजे 5 लाख रू ज्यामधे 2 ब्रास रेती किंमत 8 हजार रू असा एकुण 11 लाख 8 हजार रुमुद्देमाल जप्त करण्यात आला .यात चालक आरोपी 1. चालक भिवसन गणपत मंगाम, कुरई चालक 2.चालक अरविंद मारोती बोबडे 3.मालक मोहन निलकंठ बोबडे यांचा विरुद्ध शिरपूर पोलिस स्टेशन येथे विविध कलमातर्गत कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे वाळू तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
सदरची कारवाई वरिष्ठांचा मार्गदर्शनाखाली शिरपूर ठाणेदार API संजय राठोड,PSI रामेश्र्वर कांडुरे,प्रशांत झोड, घोडाम,मोतीराम,फुलके यांनी केली.