अजय कंडेवार,वणी:- मारेगाव कडून वणीकडे येत असताना राजूर रिंगरोडवर एका अज्ञात भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघातात त्या दुचाकीवर असलेल्या मुलाचे दोन्हीं पाय चिरडल्याची धक्कादायक घटना दि.13 सप्टेंबर बुधवार रोजी सकाळी 9.30 वाजता यवतमाळ महामार्गावर असलेले राजूर रिंगरोडवर घडली आहे. याप्रकरणी पोलिसात नोंद करणे सुरू आहे. (A BOY’LEG crushed by truck ).
याबाबत सविस्तर वृत्त, ओम विलास भडके (अंदाजे वय-19 ) रा. धामणी मारेगाव हा मुलगा बुधवार दि.13 सप्टें.रोजी सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास मारेगाव कडून वणी या दिशेकडे आपल्या दुचाकीने (क्र. MH-29-AP- 1966) काही कागदपत्राचा कामानिमित्त वणीकडे जात होता तेव्हा अचानक मागून भरधाव वेगाने येत असलेल्या अज्ञात ट्रकने जोरदार धडक दिली.
या भिषण अपघातात ओम भडके या मुलाचे दोन्ही पाय ट्रकच्या पुढील चाकाखाली दबले गेले .आणि तो ट्रक हा पसार झाल्याचे कळले.हा अपघात एव्हढा भयंकर होता की त्या मुलाचा पायाचे चेंदामेंदाच झाला. घटनास्थळी पोलीस पोहोचले असता त्या मुलाला ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आल्याची माहिती आहे. वृत्त लिहीपर्यंत पुढील चौकशी सूरू होती.