•काटा करण्यासाठीं बेकायदेशिररित्या उभे ट्रक ठरताहेत यमराज….
अजय कंडेवार,वणी:- दुचाकीने वणी कामानिमित्त गेलेले हे दोन्ही तरुण राजूर आपल्या गावाकडे दि.2 मे ला रात्री 9.30 वाजता परत येत असताना अचानक काळाने त्याच्यावर घाला घातला. श्रीकांत सिनू उर्फ (श्रीनिवास) दोब्बलवार अंदाजे वय (23) रा. राजूर असे या अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर त्याच्या सोबत असलेला अमोल कोम्मलवार अंदाजे वय (22) रा. वणी हा अत्यंत गंभीर आहे. अशी विश्वसनीय माहिती मिळाली आहे.A young boy was killed by a standing truck on the Ring Road.yamraj is illegally parked trucks for cutting forks….
मृतक श्रीकांत सिनू उर्फ (श्रीनिवास) दोब्बलवार अंदाजे वय 23 (रा. राजूर) हा काही कामानिमित्त वणी येथे गेला होता. तो आपले काम आटपून राजूर या आपल्या गावाकडे परत येत असताना हा अपघात झाला. राजूर रिंगरोड जवळ रोडवर बेजबाबदारपणे त्याच ठिकाणी तेथीलच एका काट्यावर काटा करण्यासाठीं उभा करण्यात आलेला भरलेला कोळसा ट्रक दृष्टीस न पडल्याने उभ्या ट्रकवर दुचाकी आदळली. दुचाकीची (MH-34 DX-7075 ) ट्रकला जोरदार धडक बसल्याने दुचाकीस्वार श्रीकांत दोब्बलवार याला डोक्याला जबर दुखापत झाल्याने तरुण जागीच ठार झाला. तर दुचाकी वरील दुसरा तरुण गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारार्थ चंद्रपूरला हलविण्यात आले आहे. परंतू अद्याप परिपूर्ण जखमीची माहीती मिळाली नाही.
पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला व पुढील तपास वणी पोलीस करत आहेत. वृत्तलिहीपर्यंत पोलीस चौकशी सुरू होती आणि चंद्रपूर हलविलेल्या त्या जख्मीची अद्यापही माहिती मिळाली नव्हती.
” मागील 4 दिवसापासून राजूर रिंगरोड वरील काट्यावर कोळसा भरून ट्रक एका रांगेत उभे राहत असताना ये-जा करण्यासाठीं सुद्धा नाहक त्रास सहन करावा लागत आहे आणि हे सर्व भरलेले ट्रक रस्त्याचा दोन्हीं बाजूला उभे असायचे आणि मध्यभागीच रस्ता ये जा करण्यास सुरू असायचा. परंतू वाहतूक प्रशासन याकडे लक्ष का देत नव्हते हे कोडच….अखेर त्या तरुणाचा या उभ्या ट्रकांमुळे निष्पाप जीव गमवावा लागला आता जबाबदार कोण….?” डोळेबंद प्रशासन की उभा ट्रक ?