Tuesday, May 26, 2026
HomeBreaking Newsराष्ट्रीय संपत्तीची अफरातफर, तात्काळ चौकशी करा.....!

राष्ट्रीय संपत्तीची अफरातफर, तात्काळ चौकशी करा…..!

•KPCL कंपनीचे मालक व ट्रान्सपोर्टरचा संगनमताने कोळशाची खुल्या बाजारात बेकायदेशीर विक्री.

•जिल्हाध्यक्ष उमेश बोडेकर यांची थेट C.B.I कडे तक्रार.

विदर्भ न्यूज डेस्क :- चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात स्थित असलेल्या कर्नाटका सरकार च्या के.पी.सी.एल (KPCL) कोळसा खाणीतुन निघालेल्या कोळशाची खुल्या बाजारात बेकायदेशीर विक्री करून कर्नाटकात जाणाऱ्या कोळशात ओव्हर बर्डन (O.B) ची काळी माती मिक्स मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे या गंभीर प्रकाराची दखल घेऊन तात्काळ चौकशी करावी व यामध्ये सामील सर्वांच्या संपत्तीची चौकशी करावी आणि त्यांच्यावर राष्ट्रीय संपत्तीची अफरातफर प्रकरणी व भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हे दाखल करून अटक करण्याकरीता चंद्रपूर जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी तथा चंद्रपूर -वणी-आर्णी लोकसभा समन्वयक उमेश बोडेकर यांनी नवी दिल्ली येथील केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (Central Bureau of Investigation) यांना तक्रार करीत मागणी केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात असलेल्या कर्नाटका सरकार च्या केपिसीएल (KPCL)कोळसा खाणीतुन निघालेल्या कोळशाची खुल्या बाजारात बेकायदेशीर विक्री करून कर्नाटकात जाणाऱ्या कोळशात ओव्हर बर्डन(OB) ची काळी माती मिक्स करण्यात येत असल्याचा गंभीर प्रकार सुरु आहे. या कोळसा खाणीचे उत्खनन व वाहतूक करण्याचे काम ज्या कर्नाटका एमटा ला देण्यात आले. त्या कंपनीचे मालक व ट्रान्सपोर्टर मिळून दररोज हजारो टन कोळसा खुल्या बाजारात विकत आहे,असा घणाघाती आरोप जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी चंद्रपूर, तथा चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा समन्वयक उमेश बोडेकर यांनी निवेदनातून केलेला आहे.

या दरम्यान शासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडवून कोट्यावधी रुपये कंत्राटी कंपन्या व अधिकारी यांच्या खिशात जात आहे. या कंपनीच्या कोळसा खाणीतून निघालेल्या कोळशात या खदानीतुन निघणाऱ्या ओबी(OB) ला काळ्या चुरीत मिक्स करून ते मिक्स झालेली ओबी(OB) मग 50% टक्के कोळशांत मिसळली जाते आणि तो मिक्स झालेला कोळसा पॉवर प्लांट(Power Plant) ला पाठवला जातो. हा खेळ मध्यरात्री खेळला जात आहेअसेही या निवेदनातून घणाघाती आरोप केले आहे.

 

के.पी.सी.एल (KPCL)च्या या कोळसा खाणीत चाललेल्या या गैरप्रकाराची तक्रार स्थानिक प्रशासनाला देऊन सुद्धा कुठलीही कार्यवाही होतं नाही कारण मलिंदा भेटून असल्यानं ते काय पंनकणार दरम्यान या खाणीतून कोळसा चोरीचे काम मध्यरात्रीत हायवा ट्रक ने होतं असून “नंदोरी टोल टॅक्स मार्गे हे ट्रक नागपूर” ला जात असतात,जर या टोल नाक्यावर सिसिटीव्ही फुटेजचे तपास केले, तर याचा भंडाफोड होईल, असा स्पष्ट संकेतही या निवेदनातून उमेश बोडेकर यांनी दिले आहे.विशेषतः कोळसा चोरी हजारो टन कोळशाची असून शासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल यामुळे बुडत आहे त्यया गंभीर प्रकाराची दखल घेऊन तात्काळ चौकशी करावी व यामध्ये सामील सर्वांच्या संपत्तीची चौकशी करावी आणि त्यांच्यावर राष्ट्रीय संपत्तीची अफरातफर प्रकरणी व भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हे दाखल करून अटक करावी अन्यथा भाजपा कामगार आघाडी तर्फे या कंपनी विरोधात कामबंद आंदोलन करण्यात येईल. असा स्पष्ट इशारा या तक्रारीतून देण्यात आला आहे. या तक्रारीचा प्रति नवी दिल्ली राष्ट्रीय सतर्कता आयोग, चंद्रपूर जिल्हाधिकारी , चंद्रपूर पोलीस अधीक्षक साहेब, भद्रावती तहसीलदार ,पोलीस स्टेशनं भद्रावती,पोलीस निरीक्षक यांना पाठविण्यात आलें आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page