सुरेंद्र इखारे,,वणी – काल दिनांक २२/०९/२०२२ रोज गुरुवारला मातोश्री पुनकाबाई प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा येथे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता 15 अंतर्गत माननीय सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यवतमाळ भाऊराव चव्हाण यांनी शाळेला भेट दिली शाळेतील परिसर व विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
नुकताच सुरू असलेला राष्ट्रनेता ते राष्ट्र पिता या पंधरवळ्याअंतर्गत सहाय्य आयुक्त समाज कल्याण विभागीय यवतमाळ भाऊराव चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांमध्ये सेवाभावी वृत्ती जागृत व्हावी देशप्रेम देशभक्ती इत्यादी मूल्य अंगीकृत व्हावे ,या उद्देशाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला जय बजरंग शिक्षण संस्थेचे सचिव गणेश ऊदकवार संकेत ऊदकवार व शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वडके यांनी केले व आभार प्रदर्शन गदलवार यांनी केले.