•शहरातील शिवसैनिकासह युवासेनेचा जिल्हाप्रमुखाचाही दिसला दम.
अजय कंडेवार,वणी :- शिंदे गटात (Eknath Shinde) सहभागी असलेल्या रामदास कदमांच्या (Ramdas Kadam) विरोधात वणी येथील शिवसैनिक (Shivsena) देखील आक्रमक झाले होते. दापोली येथील एका कार्यक्रमात शिंदे गटाचे रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंबीयांवर केलेल्या टीकेचे पडसाद आता उमटू लागले आहे. शिवसैनिकांनी रामदास कदम यांच्या विरोधात घोषणाबाजी देत पुतळ्याचे जाळपोड करीत शिवसैनिकांचा आक्रमक पवित्रा दिनांक 21 सप्टेंबर ला बुधवार रोजी टिळक चौकातील शिवाजी पुतळ्यासमोर आंदोलनात दिसून आला व त्यात युवा सेनेचे विक्रांत चचडा जिल्हा प्रमुख यांचा ही दम खासच दिसून आला तसेच रामदास कदम यांचा शिवसैनिकांनी निषेध नोंदवत हल्लाबोलही केला आहे.
दापोली येथे एका कार्यक्रमात ठाकरे कुटुंबाबद्दल रामदास कदम यांनी आक्षेपार्ह विधान केले होते त्यावरून शिवसैनिक आक्रमक झाले आहे.वणी येथेही या रामदास कदम यांच्या पुतळ्याच दहन करत शिवसैनिकांनी निदर्शने करत निषेध नोंदवला.
रामदास कदम यांच्या ठाकरे कुटुंबीयांवरील विधानाचे राजकीय पडसाद आता उमटायला लागले असून सेनेकडून याचा तीव्र निषेध नोंदवला जात आहे.कदम यांच्या विरोधात आता संपूर्ण राज्यात शिवसेनेकडून आंदोलन केले जात असून रामदास कदम यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.रामदास कदम हे शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर देखील कदम यांनी ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला होता तेव्हापासूनच कदम आणि ठाकरे यांच्यात संघर्ष अधिक चिघळला आहे.कदम हे कधीकाळी मातोश्री जवळचे पदाधिकारी म्हणून ओळखले जायचे, त्यांना सेनेकडून विरोधी पक्षनेते पासून मंत्रीपद देखील देण्यात आले होते.कदम आणि ठाकरे यांच्यातील संघर्ष अधिक टोकदार होत असतांना कदम मातोश्रीबद्दल विधान करत असल्याने शिवसैनिक कदम यांच्याविरोधात आंदोलन करीत आहे.
याप्रसंगी संजय निखाडे (उपजिल्हा प्रमुख),विक्रांत चचडा( युवासेना जिल्हाप्रमुख) सुधीर थेरे(शहर प्रमुख )चंद्रकांत घुगुल, सुनील कातकडे,गणपत लेडांगे, राजू देवडे, प्रशांत बलकी, रिंकू पठान,संजय आवारी, महेश चौधरी यांच्यासह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते.