•शिवसेना प्रणित शिव शक्ती वाहतूक सेना नियुक्त्या जाहिर…
अजय कंडेवार, वणी :- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने वाहतूकदारांच्या व कामगारांच्या न्याय-हक्कासाठी संघटनेची ध्येय, धोरणे आणि वाहतूकदारांचा हित लक्षात घेता शिवसेना प्रणित शिवशक्ती वाहतूक सेना यांच्या आदेशावरून व शिवशक्ती वाहतूक सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अली भाई यांनी सुचविल्या प्रमाणे शिवशक्ती वाहतूक सेना सरचिटणीस सैय्यद रब्बानी चिश्ती यांनी गजेंद्र घरत राज्य उपाध्यक्ष तर प्रशांत चंदनखेडे यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदांवर नियुक्ती करीत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
वाहतूकदारांवर होणारे अन्याय व त्यांच्या समस्या सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्याचा तुम्ही सर्वोतपरी प्रयत्न या सेनेचे राहणार आहे. तसेच वाहन चालकांच्या समस्यांचं निराकरण करणे यातही महत्वपूर्ण योगदान राहनार आहे.वाहतूकदारांच्या न्याय व हक्कासाठी प्रामाणिक प्रयत्न व तसेच इतरही समस्या सोडविण्यात पुढाकार घ्यावा हाच एकमेव उद्देश ठेऊन या महत्वपूर्ण पदांवर नियुक्ती करण्यात आले आहे.