•शेकडो समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग
अजय कंडेवार,वणी:- तालुक्यातील मिनी इंडिया म्हणून ओळख असणारे राजूर कॉ येथे रविवार दिनांक 30 ला सूर्याला अर्घ्य देत दिनांक 31 उगवत्या सूर्याला नतमस्तक करीत समाजबांधवांनी ‘छठ पूजा ‘ उत्साहात साजरी करण्यात आली़.
छठ पूजेसाठी महिला व्रत पाळतात. या पूजेसाठी छोटे तळे तयार करण्यात आले होते. त्यातील पाण्यात उभे राहून मावळत्या सूर्याला अर्घ्य देण्यात आले; तसेच नैवेद्य दाखवून पूजा केली़ यासाठी उसाच्या मंडपाचे यापूजेला महत्त्व असल्याने त्यासाठी महिलानी पाण्यात ऊस उभे करून सुपातील नैवद्य सूर्याला अर्पण केला. छठपूजेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान आज, सोमवारी पहाटे साडेचार वाजता गावातीलच तलावावर या छठपूजेची सांगता करण्यात आली. दिवाळी सणानंतर सहाव्या दिवशी छठपूजेला सुरुवात होते.छठपर्वात नदीच्या पाण्यामध्ये उभे राहून व्रती सूर्याचे ध्यान करीत अर्घ्य देतात. यानिमित्त गावातील एका तलावात उसाची पूजा उभारली होती. गहू, तूप, गूळ यांपासून तयार केलेला ढकुआ पदार्थांचा नैवेद्य व पूजेसाठी पाच फळे आणली होती. शेवटचा दिवस म्हणून सोमवारी सकाळी उगवत्या सूर्याची पूजा करण्यात आली. विशेष या कार्यक्रमाला राजूर मनसे नी यशस्वीतेकरीता मौलाचे सहकार्य केले .
यावेळी गावातील जेष्ठ समासेवक संजय सिंग,अरबाज खान, थॉमस कोमलवार, विवेक निमसटकर ,शंकर बोरगलवार ,अमर सोलंकी, सुमित संजय सिंग, अराफत खान, गजानन यादव ,बादल यादव ,नित्या दुबे ,विनोद यादव ,गोविंद यादव व आकाश जोगदंडे,शंकर सिंग (वणी)व समस्त समाजबांधव उपस्थित होते.