राजूर येथे ” नावीन्या कृषी केंद्राचे ” शुभारंभ ….!
अजय कंडेवार,वणी : कॉ. नंदकिशोर लोहकरे हे शोषणविहिन समाजव्यवस्थेचे स्वप्न उराशी बाळगून आंबेडकर व मार्क्स यांच्या विचार जोपासून सातत्याने संघर्षात आहेत. अशातच त्यांना सुविद्य पत्नी अंजुषा हीची साथ लाभल्याने तसेच बियाणे , औषधी च्या नावाखाली होणारी शेतकाऱ्यांची प्रचंड लूट पाहून त्यांनी कृषी केंद्र लावण्याचे ठरविले. त्यामुळे लोहकरे यांचे नावीन्या कृषी केंद्र हे शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन, योग्य बियाणे, खते व औषधी त्याचप्रमाणे शेतीला लागणारी साहीत्य हे योग्य व माफक दरात देण्याचे ठरविल्याने हे कृषी केंद्र शेतकऱ्यांचे मित्र असतील, असे मत नावीन्या कृषी केंद्राचे शुभारंभ प्रसंगी आलेल्या गावातील मान्यवरांनी व्यक्त केले.
या नावीन्या कृषी केंद्राचे उदघाटन आयु. मंगला ईश्वर लोहकरे व आयु. सुमित्रा धर्मेंद्र लोखंडे यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मार्गदर्शक म्हणून शेतकरी व कामगार नेते कॉ. कुमार मोहरमपुरी, गुण नियंत्रण विभाग, अकोला चे शाखा अभियंता अमोल वासेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प सदस्य संघदीप भगत, माजी पंस सभापती वसुंधरा गजभिये, माजी पंस सदस्य अशोक वानखेडे, माजी सरपंच प्रणिता मो. असलम, पो. पा. वामन बलकी, आदिवासी नेते लीलाधर आरमोरीकर, जयंत कोयरे, गणेश रामटेके उपस्थित होते. गावातील ह्या मान्यवरांनी उपस्थित शेतकरी व जनते समोर आपले विचार व्यक्त करून मार्गदर्शन केले.
ह्या नावीन्या कृषी केंद्राचे शुभारंभ प्रसंगी झालेल्या मार्गदर्शन पर कार्यक्रमाचे संचालन आयु. सेवकदास नगराळे यांनी केले तर प्रास्ताविक कॉ. नंदकिशोर लोहकरे यांनी केले व आभार कॉ. हरीश वासेकर यांनी केले.