•तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा अतिशय उत्साहात…
• तालुक्यातील 110 शाळांचा सहभाग.
अजय कंडेवार,वणी:- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत खेळ व कला संवर्धन मंडळ पंचायत समिती, वणी व्दारा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा तथा कबबुलबुल 2023-2024 मेळाव्याचे आयोजन केंद्र जि.प.केंद्रशाळा राजुर कॉ. दिक्षाभूमी परिसर येथे ता.१५ जानें ते १८ जानेपर्यंत नुकतेच करण्यात आले आणि अतिशय उत्साहात पार ही पडले.त्यात जिल्हा परिषद परमडोह या शाळेचे विद्यार्थी चॅम्पियन ठरले तर रासा केंद्रातील घोन्सा शाळा शो-ड्रिल मध्ये अजिंक्य ठरली त्यांनाही पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा देण्यात आल्या.
या क्रीडा स्पर्धेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच ग्रामपंचायत राजुर कॉ सरपंच विद्या पेरकावार,उद्घाटक प्रमुख अतिथी आमदार वणी विधानसभा क्षेत्र संजीवरेडी बोदकुरवार, विशेष अतिथी म्हणून B.D.O किशोर गज्जलवार व माजी जिल्हा परिषद सदस्य संघदीप भगत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश जुनघरे, केंद्राचे केंद्रप्रमुख अशोक कोंगरे यांची उपस्थिती होती. मान्यवरांनी महात्म्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीपप्रज्वलन केलें व क्रीडा ध्वज फडकावून या स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला.
जि.प.केंद्रशाळा राजुरचे मुख्यद्यापक राजेश निरे यांच्या नेतृत्वाखाली उत्तमरित्या आयोजन आणि नियोजन शिस्तबद्द पद्धतीनें केली.खेळ सुरू होण्याआधी खेळाडूंना शपथ देण्यात आली.या क्रीडा स्पर्धेत कबड्डी, लंगडी, खो-खो, लांब उडी, उंच उडी, टेनिक्वाइट, कॅरम, बुद्धिबळ आदी सांघिक व वैयक्तिक खेळांचा समावेश होता. या क्रीडा स्पर्धेत कबबुलबुल मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते. या कबबुलबुल मध्येही तालुक्यांतील 110 शाळा केंद्रातील शाळांनी सहभाग नोंदविला. त्यात जिल्हा परिषद परमडोह या शाळेचे विद्यार्थी चॅम्पियन ठरले. या उद्घाटनिय कार्यक्रमाचे संचालन बच्चेवार सर तर समारोपीय कार्यक्रमाचे (बक्षीस वितरणाचे ) अध्यक्ष माजी पंचायत समिती सदस्य अशोक वानखेडे हे होते. या समारोपीय कार्यक्रम संचालन प्रकाश तालावार यांनी केले तर जी.प.राजूर मुख्यध्यापक राजेश नीरे यांनी आभार मानले.
ही स्पर्धा यशस्वितेसाठी गावातील दाविद पेरकावार ,अक्रम सिद्धिकी, रियाजूल भाई,मंगेश जुनघरे, समय्या कोंकटवार ,राजेश बोरगलवार,संदीप डवरे,अनिल डवरे,सोनाली भुसारी,पायल डवरे,आशा रामटेके,आशा मोडक, विवेक निमसटकर व समस्त शिक्षकवृंद यांनी अथक परिश्रम घेतले. पंच व गुणलेखक म्हणून शिक्षक हरिहर निमसटकर ,प्रकाश तालावर ,राजेंद्र खोब्रागडे,संजय साखरकर, गजानन दोडके ,उत्तम कोवे, अशोक कोंगरे, महादेव धगडी, देवेंद्र बच्येवार, विलास टोंगे ,रमेश बोबडे , जीवन चौधरी, प्रदीप पवार, शंकर टिकले, अभय भुजाडे, संतोष सांबरे, शाळेतील शिक्षिका छाया वागदरकर,माया सिडाम, प्रणिता यंगणतीवार ,मंगला पिदूरकर, तलांडे ,खोब्रागडे ,पळसोनी, डांगे मॅडम, केळकर मॅ, हिमा जुनघरे, सीमा डवरे, संगीता गारघाटे, विना आरोडा, मधुकर कोडापे, राजेश खुसपुरे,अरविंद नौकरकर, सुनिल क्षीरसागर, रेखा बोबडे,बाळासाहेब वासेकर, जीवन गोडे, सुनील वाटेकर, प्रविण वैद्य,प्रमोद झांबरे,आशिष थुल ,ठोंबरे,स्वप्नील सोनोने व तालुक्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनींनी काम पाहिले व उत्तमरित्या सहकार्य देखील केले.