•चिमुकल्यांनी नृत्य सादर केले
अजय कंडेवार,वणी(25 डिसें) – तालुक्यातील राजूर हे गाव सर्वात मोठे गाव मानले जातात तसेच मिनी इंडिया म्हणून या गावची ओळख आहे.या गावात फ्री मेथॉडीस्ट चर्च मध्ये दिनांक 25 डिसेंबर 2022 रोजी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कोर कमिटीचे अध्यक्ष पास्टर गिरीश शिरमनवार यांनी समस्त ख्रिस्त बांधवांना येशूचा संदेश वचनाद्वारे समस्त जनतेला दिला तसेच उपस्थितांना नाताळच्या भरघोस शुभेच्छा दिल्या .
चर्चचा युथ टीमने क्रिसमसनिमित्त सर्व चर्च इमारत सजावट करण्यात आली. येथील चर्चमध्ये इस्त्राईलची आठवण म्हणून येशूचे जन्माचे शिल्प चित्र उभारून त्याभोवती वाळलेल्या गवताच्या सहाय्याने झोपडी तयार करण्यात आली आहे. बालचमूंनी तयार केलेले सांताक्लॉज.चर्चमध्ये येशू ख्रिस्त यांचे जन्म ठिकाण असलेले बेथलेम ठिकाणाची हुबेहुब प्रतिकृती साकारण्यात आले.क्रिसमस ट्री येथे उभारण्यात आल्याने गर्दी देखील जमली. कारण प्रभू येशू ख्रिस्त यांनी संपूर्ण जगाला प्रेम, शांती व क्षमा अशी शिकवण दिली असे मत व्यक्त केले आहे.
मागील दोन दिवसापासुनच गावात नाताळ हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केल्या जात आहे त्यात ख्रिस्त बांधवांनी एक दिवस भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.चर्चचा वतीने पवित्र पुस्तक देऊन करण्यात आले.दिनांक 24 डिसें ला सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आले अनेक चिमुकल्यांनी नाटक, नृत्य व गायन ही सादर केले. सर्व मान्यवरांचे उपस्थितीत येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस केक कापून उपस्थितांना नाताळाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी फ्री मेथॉडीस्ट चर्चच्या कमिटी, युथ कमिटी, महिला कमिटी व समस्त समाज बांधवांनी परिश्रम घेऊन उत्सव साजरा केला.
ख्रिसमस म्हणजे काय?
” ख्रिसमस (Christmas 2022) हा ख्रिश्चन धर्माचा सर्वात महत्वाचा आणि जगातील सर्वात लोकप्रिय सण आहे. दरवर्षी 25 डिसेंबर रोजी हा सण साजरा केला जातो. या उत्सवाला प्रत्येक जाती-धर्मात समान लोकप्रियता मिळाली आहे. यानिमित्ताने रंगीबेरंगी सजावट आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांमुळे या उत्सवात सर्वधर्मातील लोक मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. ईसाई बांधव हा सण मोठया उत्साहाने साजरा करतात. या दिवशी जिसस ख्रिस्त (Jesus Christ) म्हणजेच प्रभु ईसा मसीह यांचा जन्म झाल्याचे सांगण्यात येते. त्यांच्या जन्माच्या आनंदात हा सण साजरा केला जातो. येशू ख्रिस्ताला देवाचा पुत्र (Son of God) म्हटले जाते. ख्रिसमस (Christmas) हे नाव देखील ख्रिस्तापासून पडले आहे.”