Thursday, March 5, 2026
HomeBreaking Newsराजूर येथील फ्री मेथॉडीस्ट चर्चमध्ये "नाताळ" उत्साहात साजरा......

राजूर येथील फ्री मेथॉडीस्ट चर्चमध्ये “नाताळ” उत्साहात साजरा……

अजय कंडेवार, वणी | वणी तालुक्यातील ‘मिनी इंडिया’ म्हणून ओळख असलेल्या राजूर गावातील फ्री मेथॉडीस्ट चर्चमध्ये 25 डिसेंबर 2025 रोजी प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस अर्थात नाताळ मोठ्या उत्साहात व भक्तिभावात साजरा करण्यात आला. या पवित्र सोहळ्याला ख्रिस्त बांधवांसह ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फ्री मेथॉडीस्ट चर्चचे सी. एस. दिलीप दिवसे तर कोअर कमिटीचे अध्यक्ष पास्टर शामवेल शालुरकर प्रमुख उपस्थित होते. यावेळी त्यांनी वचनाद्वारे प्रभू येशूंचा प्रेम, शांती व क्षमाशीलतेचा संदेश उपस्थितांना दिला तसेच सर्वांना नाताळच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.नाताळनिमित्त चर्च परिसर आकर्षक रोषणाई व सजावटीने उजळून निघाला होता. इस्त्राईलची आठवण म्हणून प्रभू येशूंच्या जन्माचे शिल्प उभारण्यात आले होते. वाळलेल्या गवताच्या सहाय्याने तयार करण्यात आलेली झोपडी, बेथलेमच्या जन्मस्थळाची हुबेहुब प्रतिकृती, बालचमूंनी साकारलेला सांताक्लॉज आणि भव्य क्रिसमस ट्री हे विशेष आकर्षण ठरले. या सजावटीमुळे भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.नाताळ उत्सवाचे औचित्य साधून दिनांक 24 डिसेंबर रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चिमुकल्यांनी नाट्यप्रयोग, नृत्य व गायन सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मान्यवरांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चर्चचे खजिनदार प्रकाश तालावर यांनी केले.

मान्यवरांच्या उपस्थितीत येशू ख्रिस्तांच्या जन्मदिवसानिमित्त केक कापून सर्वांना नाताळच्या शुभेच्छा देण्यात आल्या. गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण गावात नाताळचा उत्साह दिसून येत असून ख्रिस्त बांधवांच्या वतीने भव्य रॅलीचेही आयोजन करण्यात आले होते. तसेच चर्चच्या वतीने पवित्र ग्रंथांचे वाटपही करण्यात आले.या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी फ्री मेथॉडीस्ट चर्च कमिटी, युथ कमिटी, महिला कमिटी तसेच समस्त ख्रिस्त समाज बांधवांनी मोलाचे सहकार्य करून नाताळचा उत्सव आनंदात साजरा केला.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page