Ajay Kandewar,Wani:- वणी परिसरातील राजूर येथे धुर आणि धूळ प्रदूषणाचा प्रंचड प्रकोप पहायला मिळतो. यासोबत या भागात असलेल्या चुना भट्ट्यांच्या धुरांड्यातून निघणाऱ्या विषारी धुरामुळे केवळ मानवी जीवनच नाही तर पशुधन आणि शेती व्यवसायदेखील धोक्यात आला आहे. असे असताना याबाबत कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने या भागातील मानवी आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तरीही याकडे आरोग्य विभाग व प्रदूषण विभाग अक्षरशः कोमात असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.
वणीपासून अगदी जवळ असलेल्या राजूर कॉलरी येथे ५० पेक्षा अधिक चुनाभट्ट्या आहेत. यापैकी आता काहीं चुनाभट्ट्या सुरू आहेत. या चुनाभट्ट्याच्या धुरांड्यातून निघणाऱ्या धुरामुळे केवळ राजूर कॉलरी येथीलच नाही तर अवतीभोवतीची ८ ते १० गावे बेजार आहेत. या नागरिकांना २४ तास या धुराचा सामना करावा लागत आहे.गावकऱ्यांना अनंत अडचणी, समस्यांचा सामना करावा लागत आहे.मुळात धुळीचे व्यवस्थापन करण्याची संपूर्ण जबाबदारी चुना भट्टींचा मालकांची असताना देखिल मात्र थातूरमातूर उपाययोजना करीत असल्याचे विदारक चित्र वणी तालुक्यात पहायला मिळते. विशेषतः यातील सर्व चुनाभट्ट्या झिझल्या अवस्थेत असून धूर निघनारी चिमणी देखिल फुटलेल्या, तूटलेल्या अवस्थेत असून विभागाने दिलेल्या सूचनेनुसार सुद्धा नाही.त्याचा परिणाम मानवी जीवनावर पडत आहे.पण याचा काहीही फरक आरोग्य व प्रदूषण विभागाला पडत नाहीं ही शोकांतिका आहे याचाच अर्थ असा की, “अपना काम बनता भा*** मे जाये जनता “ अशी येथील चुनाभट्टी मालकांची व कोमात असलेल्या विभागाची स्थिती आहे.
•राजूर गावात वाढतोय विविध आजारांची बाधा….
“धूळ प्रदूषणामुळे दमा, त्वचा रोग, पोटाचे विकार, दृष्टीदोष, बहिरेपणा या आजारांचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. धुरात समाविष्ट असलेले हानिकारक कण आणि वायू थेट आपल्या फुफ्फुसांवर परिणाम करतात. हा धूर जास्त वेळ श्वासातून आपण आत घेतल्यास दमा, ब्राँकायटिस आणि फुफ्फुसात जळजळ यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.प्रदूषणाचा पशुधनावरदेखील परिणाम होत आहे. कोळसा वाहतुकीमुळे जनावरांच्या चाऱ्यावर धूळ बसते. पाळीव जनावरे मग हाच चारा खातात. त्यातून त्यांना वेगवेगळे आजार जडत आहेत.”