Ajay Kandewar,Wani:- ग्रामपंचायत कार्यालयात आठ सदस्यांचे राजीनामे प्राप्त झाल्यानंतरही प्रश्न सुटलेला नाही, उलट राजीनाम्यांपेक्षा दबाव आणि नाटकच अधिक चर्चेत आले आहे. ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम २९(१) व (२) अन्वये राजीनामा हा वैयक्तिक, स्वतःच्या सहीने व सरपंचांना उद्देशून विहित नमुन्यात देणे बंधनकारक असल्याचा कायदेशीर आधार पुढे करण्यात आला.

मात्र खरा सवाल असा आहे की, हा विहित नमुना कायद्याची गरज होती की विरोध मोडून काढण्याचा दबाव?कारण सरपंचांनी स्वतःच आठही सदस्यांना विहित नमुना पुरवून पुन्हा वैयक्तिक राजीनामे मागवले. राजीनामे दिले गेले.पण तरीही ते मंजूर न करता विषय लटकवून ठेवण्यात आला, हेच अनेक संशयांना जन्म देत आहे.आठही सदस्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, राजीनाम्यांचं नाट्य आता संपलं आहे.आम्ही एकत्रितपणे एकाधिकारशाही, भोंगळ,पुढाकारशाही कारभार विरोधात तसेच गावविकास व्हावा यासाठी निर्णय घेतला. सध्या गाव विकास “कामाला खो…” अशी अवस्था निर्माण झाली असून, विकासाऐवजी कारभारात हस्तक्षेप आणि गोंधळ वाढला असल्याचा आरोपही सदस्यांनी केला आहे.विशेष म्हणजे, सरपंच पतीच्या कथित हस्तक्षेपामुळेच हा सगळा वाद पेटला, अशी जोरदार चर्चा गावात सुरू आहे. निर्णय सरपंचांचे नसून बाह्य हस्तक्षेपामुळे कारभार चालतोय का? असा थेट सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे. त्यामुळेच आठ सदस्यांचा संयम सुटला आणि राजीनाम्याचा मार्ग स्वीकारावा लागला, अशी खमंग माहिती समोर येत आहे.

आज गावात एकच प्रश्न घुमतोय विहित नमुना कायद्याचा भाग होता की दबाव टाकण्याचं हत्यार?राजीनामे मागवूनही ते मंजूर न करण्यामागचं नाटक नेमकं काय?एक मात्र स्पष्ट आहे — या प्रकरणाने ग्रामपंचायतीतील भोंगळ कारभाराचं पितळ जनतेसमोर उघडं पडलं आहे.आता सरपंच राजीनामे तात्काळ मंजूर करतात की दबाव आणि नाटकाचा पुढचा अंक सुरू होतो, याकडे संपूर्ण गावाचं लक्ष लागलं आहे.8 सदस्यांनी दिलेले सामूहिक राजीनामे ग्रामपंचायत कार्यालयाला प्राप्त झाले. ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम २९(१) व (२) अन्वये विहीत नमुन्यात स्वतःच्या सहीनीशी सरपंचाला उददेशून लिहून द्यावे हे मुद्दे अतिशय महत्त्वाची आहे. वरून मुद्द्यावरून सरपंचांनी आठही सदस्यांना अशा प्रकारच्या विहित नमुना दिलेला होता या विहित नमुना वरून पुन्हा एकदा आठ सदस्यांनी व्यक्तिगत राजीनामाचा विहित नमुना भरून सरपंच महोदयाच्या नावाने हा विहित नमुना देण्यात आला. आता हा नमुना तर दिला परंतु आता राजीनामाचे नाट्य हे संपले असून सरपंचांनी हा राजीनामा व्यक्तिगत मागितला आता तर त्यांनी हा राजीनामा मंजूर करावा अशी त्यांची आर्थिक आहे आणि विशेष म्हणजे या आठ सदस्यांनी पुकारलेल्या यादगार हा एकाधिकारशाही आणि भोंगळ कारभाराच्या विरोधात होता तसेच विकास “कामाला खो…..”असा होत असल्याने त्यांनी एक लकार पुकारला आता तर असेही बोलले जात आहे की, सरपंच पतीचा विशेष भोंगळ कारभार एकाधिकारशाही आणि पुढाकार पुढाकार शाही त्याच्यामुळेच आठ सदस्य कंटाळले असून या आठ सदस्यांचा कंटाळलेल्या सदस्यांनी सरपंचाच्या भोंगळ व्यवहाराबाबत बाबत आणि जनतेच्या विकासासाठी दिलेला आहे अजून मामा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनलेला आहे.
“कुणाच्या इशाऱ्यावर प्रशासन नाचतंय?” ……
राजीनामे सादर होऊनही मंजुरी रखडतेय, म्हणजे प्रश्न कायदेशीर प्रक्रियेचा नसून दबावाच्या साखळीचा आहे. निर्णय टाळला जातोय, जबाबदारी ढकलली जातेय आणि वेळकाढूपणा सुरू आहे—यातून स्पष्ट होते की प्रशासन स्वायत्त नाही, तर कुणाच्या तरी राजकीय/सत्ताकेंद्राच्या इशाऱ्यावर हालचाली होत आहेत.लोकशाहीत निर्णय नियमाने होतात; इथे मात्र इशाऱ्याने होत असल्याचीच शंका बळावत आहे.

