• शिवसेनेचा बालेकिल्ल्यात मोठे खिंडार.
•असंख्य युवक,महीला व ज्येष्ठांचा भव्य प्रवेश.
अजय कंडेवार,वणी :- वणी विधानसभेत “मनसे” आपली ताकद वाढवायला लागलीय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका डोळ्यांसमोर ठेऊन मनसे नेते राजू उंबरकर यांच्या अध्यक्षतेखाली तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या मार्गदर्शनात सारंग बोथले यांचा विशेष सहकार्याने कायर गावातील युवकांचा बुलंद आवाज समाजले जाणारे राकेश विठ्ठल शंकावार यांच्यासह असंख्य जेष्ठ ,युवक व महिलांनी शिवसेनेला राम राम करीत मनसेत जंगी प्रवेश घेतला.शिवसेनेचा कार्यकर्त्यांना व युवकांना न्याय मिळावा यासाठी तसेच कार्यकर्त्यांकडे पक्षाचे होत असलेल्या दुर्लक्षामूळे त्यांनी शिवसेना पक्ष सोडून मनसेत प्रवेश घेतला.हा प्रवेश सोहळा ता.१० नोव्हेंबर रोजी आठवडी बाजाराच्या मैदानात पार पडला.यामुळें गावातील शिवसेनेचा गडाला खिंडार पडले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.येणाऱ्या काळात मनसे नेते राजु उंबरकर यांचे शिलेदार समजले जाणारे कायर गावातील राकेश शंकावार यांच्या जंगी प्रवेशाने आगामी निवडणुकीचे चित्र बदलेल यात तीळ माञ शंका नाहीच. असा अंदाज वर्तविला जात आहे.
गेल्या ३५ वर्षातील एक आमदार सोडला तर प्रत्येक वेळी मतदारसंघानी सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला निवडून दिले आहे. तरी सुध्दा आज ही प्राथमिक सुविधा यात रस्ते, दवाखाने, बसस्टँड, पाणी, वीज आणि अन्य प्राथमिक गरजांसाठी भांडाव लागते. याच मुख्य कारण येथील लोकप्रतिनिधींची उदासिनता आहे अशी बोचकी टीका मनसे नेते राजु उंबरकर यांनी या प्रवेश सोहळ्यात करण्यात आले .कायरमध्ये पार पडलेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात असंख्य युवक, महीला व ज्येष्ठांनी पक्ष प्रवेश करून आगामी सर्व निवडणुकात मनसेला यश मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अवघ्या काही काळातच येऊन ठेपल्या आहेत त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बोलबाला असलेल्या वणी विधानसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जोरदार इन्कमिंग पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काम अतिशय झपाट्याने सुरू आहेत.
यावेळी मनसे महिला जिल्हाध्यक्षा अर्चना बोदाडकर, तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, विनोद कुचनकर, शिवराज पेचे, प्रताप उपरे, राजु बोदाडकर, धिरज पिदूरकर, वैशाली तायडे, राकेश विठ्ठल शंकावार, विलन बोदाडकर, विट्ठल हेपट, कैलास निखाडे, संदीप गुरनुले, सारंग बोधले, अजय शेंडे,शंकर पिंपळकर, लक्कि सोमुकुंवर, हिमांशू बोहरा, वैभव पुरानकर, गौरव पुरानकर यांच्या सह असंख्य नागरीक व मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.