अजय कंडेवार, वणी:- नगर सेवा स्वच्छता समितीचे वतीने रस्त्यावर थंडीत कुडकूडणाऱ्या निराधारांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.
गरिबीच्या झळा आणि पोटात भुकेच्या कळा सोसत अनेक निराधार वृद्ध कडक्याच्या थंडीने गारठून गेली आहेत. थंडीचा पारा वणी शहरात सामान्य तापमानाच्या खाली आला आहे. चार भिंतीच्या आत सुद्धा पांघरून ओढून झोपने थंडी सहन करणे कठीण झाले आहे, अशा परिस्थितीत सामाजिक बांधीलकी जपत नगर सेवा स्वच्छता समिती तर्फे थंडीत रस्त्याच्या बाजूला बंद झालेल्या दुकानाचा आसरा घेत झोपणार्या साई मंदिर चौक, बस स्टॅन्ड परिसर, शालिमार पान सेंटर कॉम्प्लेक्स परिसर व दिपक टॉकीज परिसरात अनेक वृद्धाना ब्लँकेट वाटप करून मायेची ऊब दिली. थंडीपासून रस्त्यावरील निराधारांचे संरक्षण व्हावे, यासाठी नगर सेवा स्वच्छता समिती मागील अनेक वर्षांपासून दरवर्षी थंडीचे दिवसात रात्रीला रस्त्यावर झोपून असलेल्या गरजवंताना हा उपक्रम राबवित असते.
यावेळी समितीचे माजी सैनिक नामदेवराव शेलवडे, माजी मुख्याध्यापक दिनकर ढवस, राजू तुराणकर, राजेंद्र साखरकर मुख्याध्यापक, विकास जयपूरकर उपस्थित होते.