• सहकार मंत्र्याचा हस्ते ॲड.देवीदास काळे यांच्या गौरव.
•’विश्वासाची संस्था ‘ हे बँकेचे ब्रीद वाक्य सार्थ ठरलेच.
अजय कंडेवार,वणी:-.स्वर्गीय भैयाजी पांपटीवार यांनी श्री.रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था नावाचं एक छोट रोपट् 10 ऑक्टोंबर 1989 लावले.भैयाजी पांपटीवार यांच्या निधनानंतर सन 2002 मध्ये ऍड.देविदास काळे यांनी या संस्थेची धुरा हाती घेत अतिशय व्यवस्थितरित्या सांभाळली.ऍड.देविदास काळे यांनी 22 वर्षांपूर्वी एका 10 बाय 10 च्या खोलीतून ही पतसंस्था सुरू केली. आज या पतसंस्थेकडे 22 शाखा व 2 स्वत:च्या मालकीच्या इमारती आहे. हे केवळ एका दिवसांमध्ये झाले नाही. ठेविदारांचा कमावलेला विश्वास व ऍड देविदास काळे यांच्यासह संचालक मंडळाचे परिश्रम यामुळे एका छोट्या रोपट्याचे आज वटवृक्ष झाले आहे. विशेष म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान, वाढती स्पर्धा, सहकार क्षेत्रातील घडामोडी या सर्वांचा समतोल साधून संस्थेने ही प्रगती केली आहे.सहकार क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याबद्दल याचाच एक भाग म्हणून “सहकार पुरस्कार २०२३” हा कार्यक्रम ता. १२ ऑक्टोंबर रोजी “होटेल ताज प्रेसीडेंट, मुंबई येथे आयोजित करण्यात आला. श्री.रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थाचे अध्यक्ष ॲड.देवीदासजी काळे यांच्या गौरव सहकार मंत्र्याचा हस्ते करण्यात आला.
ॲड.देवीदासजी काळे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार सूनील तटकरे व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे हस्ते पुरस्कार प्रदान क्षण.…
ॲड.देवीदास काळे यांचे समर्थ नेतृत्व लाभल्यामुळे श्री. रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेने आज संपूर्ण महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र, २२ शाखा व ७१८ कोटी च्या ठेवी, सतत ऑडिट वर्ग A अशी उत्तम प्रगती केली आहे.ॲड देवीदास काळे यांनी सहकार क्षेत्रात उल्लेखनीय व नेत्रदिपक कार्य केल्या बाबत राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार सूनील तटकरे व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. यावेळी ॲड देवीदासजी काळे यांचे सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची प्रशंसा करण्यात आली.वणी येथील श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था या संस्थेचे अध्यक्ष पदाची जबाबदारी मागील २२ वर्ष पासून ते समर्थपणे सांभाळत आहेत.यवतमाळ जिल्हा नागरी व पगारदार पतसंस्थांचा संघाचे ते कार्याध्यक्ष आहेत. विशेषतः वणी येथील वसंत जीनींग व प्रेसींगचे १२ वर्ष अध्यक्ष पदही त्यांनी भुषविले आहे.
मनोगत………
ॲड. देविदास पांडूरंग काळे (अध्यक्ष -रंगनाथ स्वामी पतसंस्था, कार्याध्यक्ष- यवतमाळ जिल्हा नागरी व पगारदार पतसंस्थाचा संघ, यवतमाळ ) यांचे विशेष मनोगत……
.
“विश्वासाची संस्था ‘ हे आपल्या बँकेचे ब्रीद आणि हे ब्रीद उराशी बाळगून अनेक चढ-उतारांचे साक्षीदार बनत आजवरचा प्रवास सुरू आहे. हे ब्रीद प्रत्यक्षात आणताना आपण ग्राहक, खातेदार व सभासदांनी आमच्यावर जो सार्थ विश्वास टाकला आहे, त्यातून प्रगतीची अनेक दारे खुली झाली… आणि पाहता-पाहता बँकेने मोठा टप्पा पार केला.आज संपूर्ण महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र, २२ शाखा व ७१८ कोटी च्या ठेवी, सतत ऑडिट वर्ग A अशी उत्तम प्रगती केली आहे.
७१८ कोटी रुपयांच्या ठेवींचं ध्येय गाठण्यात आजपर्यंत यश आलं, ही याची सार्थ व सर्वोत्तम पावती आहे, असं अभिमानाने सांगावसं वाटतं की येत्या काळात संस्था १००० कोटींचाही आकडा पार करेलच.हा यशस्वी प्रवास शक्य झाला आहे, तो आपणा सर्वांचा आमच्यावरील विश्वास, चांगली सेवा, सांघिक कौशल्य आणि संवादामुळेच.संवादाचे महत्त्व आम्ही जाणतोच आहोत. मात्र काळ बदलतो आहे, सेवा बदलत आहेत… ग्राहकांच्या अपेक्षाही बदलत आहेत. या काळाच्या कसोटीवर खरे उतरण्यासाठी गरज आहे ती, हा संवाद आणखी बळकट करण्याची व दुतर्फा होण्याची….
काळानुरूप संवादाची माध्यमेदेखील बदलत आहेत. त्या बदलांच्या प्रवाहात आम्हीदेखील आहोतच… मात्र अस्तित्वात असलेल्या संवाद प्रवाहाचे पात्र विस्तीर्ण व्हावे, त्या बदलांतून ग्राहकहित जोपासले जावे, आणि त्यातून आपल्या मनातील बँकेची प्रतिमा देखील अधिक स्वच्छ, स्पष्ट बनावी हाच या नव्या प्रयत्नांमागचा हेतू….
या नव्या प्रयत्नांत आपण डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एकाच वेळी ईमेल, फेसबुक, व्टिटर, या व सोशल मीडियाद्वारे संपर्कात राहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मात्र हा संपर्क आपणासाठी अधिक फलदायी, आपल्या ज्ञान, माहितीत अधिक भर टाकणारा कसा होईल, याचीच अधिक काळजी घेतली जाणार आहे…या प्रयत्नांमध्ये नेहमीप्रमाणे ग्राहकहिताला प्राधान्य असलेली माहिती, वृत्त, आर्थिक क्षेत्रातील बदलांविषयीचं मार्गदर्शन, त्याविषयी बँकेने स्वीकारलेली ग्राहकहिताची भूमिका, गुंतवणूक सल्ला, नव्या सेवा, नव्या योजना, बँकेला कुटुंब मानणाऱ्या कर्मचारी विश्वातील वार्ता,समाजहितासाठी विविध उपक्रमांद्वारे बँकेने स्वीकारलेले सेवेचे व्रत व त्याविषयीचे वृत्त या अशा अनेक गोष्टी या संवादाच्या निमित्ताने आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असणार आहे.
विशेष म्हणजे हा प्रयत्न आधुनिक रूपात, ग्राहकांना विशेषतः आमच्या तरुण ग्राहकांना अधिक भावणारा असेल आणि त्यांना त्यांच्या आर्थिक क्षेत्रातील पायवाट ठरविण्यासाठी मदतीची ठरणारी असेल.