• शहरातील समस्यांचा पाढा वाचला.
सुरेंद्र इखारे ,वणी – मा. माजी आमदार शिवसेना प्रमुख विश्वास नांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना अध्यक्ष विक्रांत चचडा यांचे नेतृत्वात युवासेनेचे शिष्टमंडळाने वणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिजित वायकोस व एम.एस. इ. बी.चे सहाय्यक अभियंता यांची भेट घेऊन वणी शहरातील समस्यांचा पाढा वाचला अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
यावेळी वणी शहरातील संपूर्ण रस्ते व त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांचे साम्राज्य या मुळे नागरिकांना वाहन चालकांना व पायी चालणार्यांना अतिशय त्रास होत असून अनेकांचा अपघात होऊन अपंगत्व आले आहे. तेव्हा रस्त्यावरून चालत असताना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे .आज रोजी नगर परिषदेचाच कर्मचारी दवाखान्यात भरती आहे तेव्हा सामान्य जनतेचे काय असा प्रश्न उपस्थित करण्यात आला पुढे नवरात्र, दसरा, दिवाळी यासारखे सण उत्सव असल्याने नागरिकांच्या उत्सवात दुःखाचे डोंगर उभे होऊ नये, यासाठी त्वरित रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी चर्चा केली.
तेव्हा मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांनी उत्तम प्रतिसाद देऊन तात्काळ रस्ता दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर याच शिष्टमंडळाने एम एस इ बी मंडळाकडे धाव घेऊन सहायक अभियंता यांच्याशी चर्चा करून वणी शहरातील विजेच्या लपंडावाचा खेळ मांडला असता अभियंता यांनी वणी शहरातील वीज पुरवठा हा 60 वर्षपूर्वी पासून आहे आजही त्याच वीज पुरवठ्याद्वारे शहरात वीज वितरण करण्यात येत आहे त्यामुळे अकस्मात कधी 10 मिनिटे तर कधी कुठे वीज पुरवठा खंडित होतो त्यामुळे शक्यतो अमच्यावतीने नियमित वीज वितरण करण्याचा प्रयत्न करू असे शिष्टमंडळाला अश्वाशीत करण्यात आले आहे. जर 15 दिवसाचे आत वणी शहरातील समस्या निकालात काढण्यात आल्या नाही तर युवासेना आपल्या पध्दतीने आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी उपस्थित विक्रांत चचडा (युवासेना जिल्हाध्यक्ष), कुणाल लोणारे, राजू लोणारे, निलेश बेलेकार, चेतन बरशेट्टी वार, राजू गोलाईत व समस्त युवासेना कार्यकर्ते होते.