•अख्खे कुटुंब रस्त्यावर, प्रचंड नुकसान.
अजय कंडेवार,वणी:- तालुक्यातील शिरपूर पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या कायर गावातील रहिवासी शंकर कोरांगे यांच्या घराला दि.27 मे. शनिवारी भर दुपारी 1 वाजताचा सुमारास आग लागली. या घटनेत संसारोपयोगी साहित्यांसह उधार घेतलेले पैसे अन् अनेक मौल्यवान आठवणी जळून खाक झाल्या. आता करावे तरी काय असा प्रश्न त्यांच्या समोर ठाकला आहे..”In this village….” The house caught fire…!The whole family on the road.
दररोजप्रमाणे कोरांगे कुटुंबीयांनी आपली दैनंदिन कामं आटोपली. दुपारून सर्व काम झाले . भर तपत्या उन्हात अचानक काहीतरी जळण्याचा वास येत असल्याचे जाणवताच त्यांना कळताच आगीने तांडव केला तसेच भयंकर समोरचे दृष्य पाहून घरच्यांना धक्काच बसला. मागच्या खोलीतून धूर निघत होता, घरात आग लागली होती. सर्वांनी घाबरून आरडाओरडा केला, आवाज ऐकताच शेजारी मदतीला धावून आले.
गावकरी जमले आणि पाण्याच्या सहाय्याने आग विझवण्याचे कार्य सुरू केले. लगेच अग्निशामक दलाची गाडी पोहोचली कसेबसे आगीवर नियंत्रण मिळवले. यानंतर गावकऱ्यांनी घराची पाहणी केली असता जवळपास सर्वच साहित्य आगीने गिळंकृत केल्याचे दिसले. कोंगरे यांच्या घरातील जीवनावश्यक वस्तू (फ्रिज, कुलर, धान्य आलमारी व टिव्ही) ,महत्वाची कागदपत्रे, दागिने, हजारों रुपयांसह अन्य साहित्य जळून खाक झाले.
कोरांगे हे त्यांच्या परिवारातील अन्य 3 सदस्यांसह त्यांच्या मातीच्या घरात राहत होते. त्यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे वर्तविण्यात येत आहे. त्यांच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी नातेवाईकांकडून काही पैसे उसने घेतले होते. मात्र, ते पैसेही आगीच्या भक्ष्यस्थानी गेल्याने आता घर कसे थाटायचे ,संसार कसा करायचा, उसनवारीचे पैसे कसे फेडायचे, घर कसं उभं करायचं असे एक ना अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाले आहेत. विशेष घरचा कर्ता देखील या जगात नाही….!