★महागाईचे संकट मकरसंक्रातीवर
अजय कंडेवार,वणी:- मकर संक्रांतीचा सण तोंडावर आला असून प्रत्येक कारखान्यात तिळगुळ बनवण्याची जय्यत तयारी सुरू आहे. एकीकडे दरवर्षीच्या तुलनेत तिळाचे भाव चाळीस रुपये वाढल्यामुळे यंदा तिळगुळ देखील तिखट झाला आहे.असे म्हणयायला हरकत नाही.कारण आज रोजी “तीळ गूळ खा….आणि गोड गोड बोला” परंतु बोलणं देखील कठीण झाल्याची परिस्थिती प्रत्येक घरात दिसून येत आहे.
मकर संक्रात म्हटले की प्रत्येक घराघरात तिळगुळ हा बनवला जातो. मात्र हल्लीच्या धावपळीच्या युगात अनेकजण हे रेडिमेड तिळगुळाला पसंती देतात. अवघ्या काही दिवसांवर मकर संक्रांत आली असून यांना मोठ्या उत्साहात या सणाची तयारी सुरू आहे. मकर संक्रांतीला तिळगुळाचे वाटप केलं जातं. आणि याच तिळगुळ बनवण्याचं काम सध्या जोरात सुरू आहे. मात्र तिळाचे दर वाढल्यामुळे तिळगुळाच्या लाडूतही 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तिळाच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 40 रुपयांनी वाढ झाली असून तिळीने 200 चा आकडा पार केला .