अजय कंडेवार,वणी :-शहरातील मोमीनपुरा परीसरात “जश्ने ईद मीलाद कमेटी” व “मदरसा हयातुल उलुमच्या” वतीने “वक्तृत्व स्पर्धेचे”आयोजन (ता.28) गुरुवार रोजी सायं.8 वाजता दर्गा परिसरात करण्यात आले. या स्पर्धेत जवळपास दीडशे विद्यार्थ्यानी सहभाग घेत “हजरत मोहम्मद पैगंबर” यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
वणी येथे मुस्लिम बांधवांनी शिस्तबद्ध मिरवणूक काढली. या प्रसंगी प्रेषित मोहंमद पैगंबर यांनी जगाला दिलेली शांती आणि मानवतेची शिकवण समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावी हा यामागील उद्देश होता.ईद-ए-मिलाद निमित्त जुलुसही अत्यंत उत्साहात व शांततेत पार पडला.देशात शांतता, सद्भाव व परस्पर धर्मात आपसी भाईचारा वृध्दिंगत व्हावा. यासाठी सामुहिक दुवा ही झाली. यानंतर सांय.8 वाजता मोमीनपुरा परिसरात “हयातुल उलुमच्या” व दर्गा परीसरातील चिमुकल्याकरीता “वक्तृत्व स्पर्धेचे” आयोजन करण्यात आले यात शहरातील दीडशे चिमुकल्यांनी सहभाग घेतला. वक्तृत्व स्पर्धा घेण्यामागील उद्देशच असा की, “नव्या पीढीला धर्मगुरुच्या शिकवणीची जाण व्हावी व मंचावर आपले विचार माडण्याची संधी देण्याच्या दुष्टीने” ही स्पर्धा घेण्यात आली. विशेषतः या स्पर्धेत विजेत्याकरिता अनेक आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली.
अ’ गटात प्रथम मान सादीया हाजी यांनी पटकाविला तर इसराईल खान द्वीतीय, शाहीद सलीम शेख तृतीय, इरम परवेज खाँ चतुर्थ, इकरा परवेज खान पाचवे स्थान पटकाविले. तर ‘ब’ गटात प्रथम इमरोज इमरान खान ,मिसबा मोहसीन खान द्वीतीय,उमेरा सय्यद जाफर तृतीय, अदीना ईसराईल खान चतुर्थ तर पाचव्या क्रमावर आमेर नईम अजीज शेख या सर्व विजेत्यांना आकर्षक बक्षिसे व प्रशस्ती पत्र देत पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी बक्षीस वितरण हाजी आरीफ कादर यानी केले. त्यांचासह प्रमुख पाहुणे अन्सार,चीनी,सुलेमान खान हे उपस्थीत होते. प्रमूख उपस्थिती म्हणून हाजी अवेश मौलाना, मुक्कीमोद्दीन,मौलाना सद्दाम उपस्थीत होते. कार्यक्रमाचे संचालन मौलाना मोहसिन रिजवी तर आभार प्रदर्शन मो.सादीक हाजी यांनी केले.या कार्यक्रमाचा यशस्वीतेकरिता इसराईल छोटे खान, असद खान, सैय्यद शाहरुख, इस्माईल खान, मो. रियाज, मो.आबीद, सैय्यद जाफर, अनवर शेख, शेख जाफर व वसीम कादरी यांनी परीश्रम घेतले.कार्यक्रमाच्या शेवट सलाम व दुआने करण्यात आले.