अजय कंडेवार,वणी:-मागील काही महिन्यांपासून वणी परिसरात दुचाकी चोरट्यांनी उच्छादच मांडला आहे व त्यातच घरफोडी वाढली आहे. शहरातील विविध भागातून दर रोज होणाऱ्या चोरीच्या घटनेमुळे पोलीस विभागसुद्धा हैराण झाले होते. दुचाकी चोरट्याला पकडण्यासाठी चंद्रपूर L.C.B टीम चा मदतीने डिबी पथकाने दुचाकी चोरट्याला चंद्रपूर जिल्ह्यातून अटक केली.पोलिसांनी वणी परिसरातील चोरी गेलेली 2 दुचाकी वाहन चोरट्याच्या ताब्यातून जप्त केली. परंतू घरफोडी करणारे माञ मोकाटच का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. मग ठाण्यातील “B” टीमचा हातातही तूरीच का?
वणी परिसरातील शाम नामदेव डांगे (वय ५२ वर्ष.रा. टागोर चौक ,स्टेट बँक समोर रंगारीपुरा वणी येथून चोरी गेलेली दुचाकी वाहनाची तक्रार 27 ऑगस्ट रोजी पोलिस स्टेशन येथे चोरीची तक्रार केली होती .त्याचा तपास सुरू असताना तब्बल 1 महिन्याने 1 मोटर सायकल सोबत इतर 1 मोटर सायकल जप्त केली.शेख अकबर शेख फारूख (वय २४ वर्ष), रा.रहेमतनगर , कब्रस्तान जवळ,जि.चंद्रपुर,असे अटक करण्यात आलेल्या अट्टल दुचाकी चोरट्याचा नाव आहे या चोरीचा प्रयत्नात एक विधिसंघर्ष बालक आहे.पोलिसांनी त्याच्याकडून काळया रंगाची हिरो होन्डा स्प्लेंडर प्लस 1 किंमत 20 हजार व पॅशन मोटार सायकल 1 किंमत 20 हजार असा एकूण 40 रुपयाची 2 दुचाकी जप्त केली.
वरिष्ठांचा मार्गदर्शनात डीबी पथक प्रमुख API माधव शिंदे, सुदर्शन वानोळे, सुहास मंदावार,हरिन्द्रकुमार भारती,पंकज उंबरकर,विशाल गेडाम व गजानन कुडमेथे यांनी केली. पुढील तपास सुदर्शन वानोळे हे करीत आहे.