•पर्यावरणाचे संरक्षण व्हावे व विद्यार्थ्यांना झाडे तसेच पर्यावरणाची ओळख व्हावी, यादृष्टीने हा उपक्रम – अश्विनी ढोले (मुख्यद्यापिका)
अजय कंडेवार,वणी:- शहरातील मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी सिटी ब्रांचमध्ये नुकताच ग्रीन डे दि.2 ऑगस्ट रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेत वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. पर्यावरण संतुलन ठेवण्यासाठी वृक्षारोपणाचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या लक्षात यावे, हा या वृक्षारोपण कार्यक्रमामागील मूळ उद्देश होता. या दिवशी विद्यार्थ्यांना हिरव्या रंगाच्या पोशाखात शाळेत बोलावून प्रत्येक विद्यार्थ्याच्या हस्ते एक रोपटे लावण्यात आले. वृक्षारोपणापूर्वी मुलांना त्याचे महत्त्व पटवून सांगण्यात आले तसेच विविध प्रकारची चित्रे, फळे व फुले असे सजावटीचे साहित्य विद्यार्थ्यांनी तयार करून आणले होते.Macaroon City Branch carried out ‘Tree Planting Movement’
पर्यावरणाचे संरक्षण व्हावे व विद्यार्थ्यांना झाडे तसेच पर्यावरणाची ओळख व्हावी, यादृष्टीने हा उपक्रम घेण्यात आला. मुख्याध्यापिका अश्विनी ढोले यांचा मार्गदर्शनात राबवण्यात आला. या शाळेचा मुखद्यापिकांचा सहकार्याने विद्यार्थ्याना नवनवीन कला गुणांना वाव मिळत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शाळेचा शिक्षकांनी सहकार्य केले.