•”ना भुतो .. ना भविष्य”असा जिल्ह्यातील एकमेव अविस्मरणीय मेळावा.
अजय कंडेवार,वणी :– येथील मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी, वणी शाळेत दि.4 फेब्रवारी शनिवारी बाल आनंद व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विशेषतः या कार्यक्रमाला “Meet My Family…..एक बंधन ” हे नाव देण्यात आले.या आनंद सोहळ्याचा विद्यार्थ्यांसह पालक व ग्रामस्थांनी खुप मनोसक्त आनंद घेतला.
शाळेने पालकांचा आनंद द्विगुणित व्हावा याकरिता एका मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्या कार्यक्रमाला “Meet My Family…..एक बंधन” आनंद मेळावा म्हणून एक वेगळ्या स्वरूपाचे नावही देण्यात आले. कारण व्यवहार ,व्यवसाय व उद्योगाचे प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळावे म्हणून मेळाव्याचे संयोजन करणे व विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील मनावरील असलेला अभ्यासक्रमाचा मानसिक ताण तणाव दूर करुन विरंगुळा मिळावा व पालकांचा अंगीकृत असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव देता यावा याकरिता नृत्य, संगीत , फॅशनशो व खेळ परिवाराकरीता घेण्यात आले. विशेष आनंद मेळाव्याला(Fun n Food) विद्यार्थ्यांनी खाद्य महोत्सवांतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थ बटाटावडा, आलूभात,मसाला पापड, सुशीला पोहे, रसवंती, भजे, आलू नड्डा, लसूनी आयते, पावभाजी, पाणीपुरी, आलुचाट , कटोरी चाट, पापडी चाट, मंचुरियन, नूडल्स, लांब पोळी, पात्वळी भाजी, इडली, सांबर वडा, चकली, मुंग वडा, कप केक अशा अनेक पदार्थांची स्वतः निर्मिती करून खाद्यपदार्थाबरोबर उद्योग क्षेत्रामध्ये आपण करिअर करू शकतो ,याचा आत्मविश्वास विद्यार्थ्यांना यावा .हा या आनंद मेळाव्याचा मुख्य हेतू होता. बाल आंनद मेळाव्यात शाळेत 400 चा वर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाला 300 चा वर पालकांनी उपस्थिती दाखविली. विशेषतः”ना भुतो .. ना भविष्य”असा जिल्ह्यातील एकमेव अविस्मरणीय मेळावा झाला.यात पालकांनी आपल्या पाल्यासहित नृत्य, संगीत , फॅशनशो व खेळ यात मनोसक्त आनंदही घेतला तसेच पाल्यांचा उत्साहद्विगुणित होण्याकरीता स्वतः स्टॉल देखील लावले. त्यात त्यांना आकर्षक बक्षीसेही देण्यात आले.गीत गायन स्पर्धेत हर्षाली म्हसे, शौर्य ठाकरे, अभिनव जुनघरी फॅशन शो मध्ये – रुद्रांश लटारे, ईश्वरी समर्थ, आनंदमेळावा स्पर्धेत- विधान देठे , श्रीयांश शिंगाने, यथार्थ हनुमंते ,खेळ स्पर्धेत युगांत नक्षिने,अभिर देठे, साहरे, विहान वासेकर, इम्रानभाई अहमद, चंदणखेडे,बेस्ट फॅमिली अवॉर्ड स्पृहा अमोल भगत या पाल्यांचा पालकांनी बक्षीसे प्राप्त केले.
आनंद मेळाव्याचे क्षण….
या कार्यक्रमाला संस्थेचे संचालक पि. एस आंबटकर हे अध्यक्षस्थानी होते.उपसंचालक पियूष आंबटकर ,प्रमूख पाहुणे म्हणून वणीतील याच शाळेचे लेडी सिंघम म्हणून परिचित असलेले व्यक्तीमत्व श्रीमती शोभना मॅडम, पालक शिक्षक व्यवस्थापन शाळा समितीचे मुस्कान रितेश शुगवानी, सोमय्या करियर इन्स्टिट्यूटचे मुख्यद्यापक कनहैया तिवारी व मॅकरून आयटीआयचे मुख्यद्यापक दामले यांच्या हस्ते आनंद मेळाव्याचे उदघाटन झाले.यातील पहिला भाग संचालन अश्विनी मिश्रा ,ऐश्वर्या लांबट व दुसरा भाग नौशाद सिद्धीकी यांनी केले.या कार्यक्रमाचा यशस्वीतेकरीता समस्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग यांनी परिश्रम केले. कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीताने करण्यात आले.