•विद्यार्थांसाठी बक्षीसाची होणार लयलूट.
अजय कंडेवार, वणी:- मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी येथे लहान मुलांचा आनंद व्दिगुणीत व्हावा या उद्देशाने भव्यदिव्य अशा बैल सजावट स्पर्धेचे आयोजन काल दिनांक 26ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. ही स्पर्धा अत्यंत उत्साहात करण्यात आली.
या बैल सजावट स्पर्धेमध्ये सहभागी अनेक वर्गाचा विद्यार्थ्यानी लाकडी बैल आणले त्याला सुंदररित्या सजविण्यात आले तसेच विद्यार्थ्यानी देखील शेतकऱ्याची वेशभूषा केली.या स्पर्धेत विद्यार्थ्यानी पारंपरिक लोकगीते म्हंटले तर काहींनी कविताही म्हटले व बैलाची सजावट करणाऱ्या लहान बालकांसाठी बक्षीसाची लयलूट व वितरण सोहळा उद्याला होणार आहे.
या स्पर्धेसाठी वृषाली सहारे व शितल निंबाळकर परीक्षक म्हणून या कार्यक्रमात उपस्थित होत्या.यामध्ये प्रथम बक्षीस, व्दितीय बक्षीस व तृतीय व इतरही प्रोत्साहनपर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.या स्पर्धा कार्यक्रमाचा यशस्वीतेकरिता समस्त शिक्षकांनी परिश्रम घेतले.