•विद्यार्थी राधाकृष्णाचा वेशात पोहोचले ….
विदर्भ न्युज डेस्क, वणी :- मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी सीबीएसई शाळेत (सिटी ब्रांच) दि ६ सप्टेंबर रोजी गोकुळाष्टमी निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांसाठी राधाकृष्ण फॅन्सी ड्रेस व सामूहिक नृत्याचे आयोजन करण्यात आले होते.
विशेष म्हणजे गोकुळाष्टमी निमित्त फॅन्सी ड्रेस व सामुहिक नृत्य मध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते. देशाची विविधतेतील अखंडता व एकतेचे दर्शन या निमित्ताने झाले.याप्रसंगी शाळेचा मुख्यद्यापीका यांनी विद्यार्थ्यांना गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशनी अन्सारी तर आभाप्रदर्शन वृषाली यांनी केले.कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.