•अन् पहिल्यांदाच ‘भव्य वाढदिवस’ सिटी ब्रांचमध्ये.
विदर्भ न्यूज डेस्क,वणी:- मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी सी.बी एस.ई शाळेचे तसेच MSPM ग्रूपचे उपसंचालक पियूष आंबटकर यांच्या वाढदिवस दांपत्यसहीत (दि.28 ऑगस्ट) सोमवार रोजी वडगाव व सिटी ब्रांच शाळेत साजरा करण्यात आला.
वडगाव येथील एक क्षण….
मॅकरून शाळेत उपसंचालक पियूष आंबटकर यांचा वाढदिवस विद्यार्थी व शिक्षकांनी जल्लोषात साजरा केला. वणी मध्यभागी असलेले सिटी ब्रांच शाळेत चिमुकल्यांचा हस्ते आंबटकर दाम्पत्याचे(संचालक -पियूष आंबटकर व अंकिता आंबटकर (डायरेक्टर ऑफ MSPM ग्रूप) महाराष्ट्र संस्कृतीला जपत औक्षणही केले. तसेच मुख्यद्यापकांचा आयोजनानुसार केक कटिंग चा कार्यक्रम जल्लोषात व संस्कृतीमय पद्धतीने पार पडला. सिटी ब्रांचचा मुख्यद्यापीका अश्विनी ढोले यांच्या मार्गदर्शनात शाळेचे उपसंचालक यांच्या वाढदिवस व सपत्नीक स्वागतही भव्य स्वरूपाचा घेण्यात आला तसेच वडगाव शाळेचा शाखेतर्फे विशेष भेटही देण्यात आले.
यावेळी या समस्त विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचा यशस्वीतेकरीता समस्त शिक्षकवृंद यांनी विशेष सहकार्य केले.