अजय कंडेवार, वणी:- तालुक्यातील मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी सीबीएसई शाळेत नाताळ सण अतिशय जल्लोषात साजरा करण्यात आला. स्कूलच्या आवारात नाताळ सणाच्या निमित्ताने अवतरले सांताक्लाॅज पाहून मुलं हरवून गेली. ख्रिसमस म्हणजेच नाताळ सणाबद्दल माहिती घेताना मुलांनी धम्माल केली.सांताक्लाॅजने मुलांना खाऊ दिला.येथील शाळेचा परीसरात ” मॅकरून ” मध्ये खेळांतून शिक्षण दिले जाते. विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून लहानपणा पासून मुलांचे व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी प्रत्यक्ष अनुभव दिले जातात.
ख्रिश्चन धर्मियांचा प्रमुख सण असणारा नाताळ जगभरात खूप आनंद आणि उत्साहाने साजरा केला जातो. या सणाची ओळख व्हावी म्हणून उपक्रम राबविण्यात आला. लहान मुलांपासून थोरामोठ्यांना नाताळची उत्सुकता असते. नाताळ हा सण जगभरात खूप उत्साहाने साजरा केला जातो.
नाताळ च्या दिवशी नाताळ वृक्ष म्हणजे ख्रिसमस ट्री उभारली जाते. ख्रिसमस ट्री हि सूचिपर्णी वृक्षापासून बनवली जाते. आणि तिला अतिशय सुंदर अशी सजावट केली जाते. याबाबत चित्रफिती दाखवून माहिती देण्यात आली. सांताक्लाॅजची वेशभूषा परिधान करून आलेल्या शिक्षकांनी आणि मुलांनी इतर मुलांना खाऊ वाटप केला. पांढरी शुभ्र दाढी, डोक्यावर टोपी घालून तांबड्या रंगाच्या कपड्यात आलेले सांताक्लाॅज आकर्षण ठरले.
भारतीय संस्कृतीची माहिती जाणून घेण्यासाठी लहान मुलांना उत्सुकता असते. आज सांताक्लाॅज शाळेत अवतरल्याने ख्रिसमसची गाणी ऐकत मुलांनी धम्माल केली.”यानिमित्ताने प्री प्रायमरी शाळेत शिक्षिका एकता लाल व वडगांव शाळेतील विद्यार्थी अक्षद शेंडे यांनी सांताक्लॉजचा पेहराव करून विद्यार्थ्यांना सणाच्या शुभेच्छा दिल्या. मुलांमध्ये जाऊन त्याने चॉकलेट वाटले. मुलांनी सांताक्लॉज बरोबर जिंगल बेल गाण्याच्या तालावर नृत्य सादर केले. विद्यार्थ्याने मेरी ख्रिसमस गीत गात शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाप्रसंगी अजय कंडेवार (मॅकरून इन्चार्ज, प्रि प्रायमरी ब्रांच, वणी), नितेश कुरेकार(सीबीएसई कॉर्डिनेटर), सुधीर लडके (पीटीआय),एकता लाल,निखिल घाटे, सुनिल तिखट,सपना तुरानकार, मीनाक्षी, शितल,प्रिया भगत, माया गीरी, अर्चना, वृषाली सहारे, संगीता पवार, शबनम गणी, अश्विनी मिश्रा, मोना पाईकराव, व समस्त आदी शिक्षकगण व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
” विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून लहानपणा पासून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी सर्वधर्म समभावाची जागरूकता तसेच प्रत्यक्ष अनुभव मॅकरून शाळेत दिले जातात.”- पियूष आंबटकर (उपसंचालक MSPM’S,Group )