•समस्त मुस्लिम बांधवांची मागणी.
•4 लाख रु.निधी मंजूर असूनही काम थंडबस्त्यात का?
अजय कंडेवार,वणी:– जिल्हा परिषद निधीतून सन २०२१-२२ मध्ये मंजूर असलेले राजूर येथील मुस्लीम कब्रस्तान वॉलकंपाऊंडचे काम त्वरित सुरु करण्याकरीता दि.23 जाने. रोज सोमवारला राजूर येथील समस्त मुस्लिम बांधवांनी राजूर ग्रामपंचायत सचिव यांना निवेदन देत साकडे घालण्यात आले.
सन २०२१-२०२२ मध्ये जि.प. संघदीप भगत यांच्या विशेष पाठपुराव्याने राजूर येथील मुस्लीम कब्रस्तानला जनसुविधे अंतर्गत 4 लाख रु. निधी देण्यात आला होता. परंतु कोणत्याही प्रकारचे ग्रामपंचायत राजुर मार्फत कोणतेही काम करण्यात आलेले नाही.तरी येत्या ७ दिवसांत मुस्लीम कब्रस्तानचे वॉलकंपाऊंडचे बांधकाम सुरु करण्यात यावे, अन्यथा संविधानिक मार्गाने आंदोलन करण्यात येईल.आंदोलनास ग्रामपंचायत राजूर प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घेण्यात यावी. त्याकरीता लवकरात लवकर काम सुरु करण्यात यावे.
यावेळी मोहम्मद असलम, रियाजुल हसन, अश्फाक भाई,अकरमसिद्दीकी,खालिद,मोसीम, सलीम, मुंसाद ,जाबिर खान यांची उपस्थिती व काही समस्त मुस्लीम बांधवांचा सह्या देखील निवेदनात करण्यात आले आहे.